Tuesday, July 14, 2026
HomeBreakingMandir Protest | झरी काँग्रेसचा 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह' आंदोलन.....

Mandir Protest | झरी काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलन…..

Ajay, Wani:- : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटी आणि देणगी निधीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापत असतानाच, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसनेही आंदोलनाची धार तीव्र केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसच्या सूचनेनुसार, खासदार प्रतिभाताई धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली झरी-जामणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि. १४ जुलै) ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले.

पाटण येथील क्रिकेट ग्राउंड परिसरातील हनुमान मंदिरात दुपारी १२ वाजता काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाआरती केली. यावेळी श्रीराम मंदिराच्या दानपेटी व देणगी निधीतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.श्रीराम मंदिराच्या निधीतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महाआरतीच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर आता काँग्रेसने ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’च्या माध्यमातून या मुद्द्यावर आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे श्रीराम मंदिराच्या देणगी निधीचा मुद्दा आता झरी-जामणीतही गाजत आहे.

पाटण ठाणेदार मिलींद सरकटे यांना निषेधाचे निवेदन व गुन्हा दाखल करण्यात यावे यासाठी मागणी करण्यात आली .या सत्याग्रह आंदोलनाचे निवेदन देताना तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष संदीप बुर्रेवार , कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती राजीव कासावार, प्रकाश कासावार , सुभाष कुडमेथे , नागोराव उरवते, सुरेन्द्र गेडाम , नंदकिशोर किन्नाके , हरिचंद्र काटकर, गणेश बेलेकर, हरिदास गुर्जलवार , अजय बाजन्लावार, राजीव आस्वले , भगवान चुक्कलवार , दिवाकर पुसाम , पांडुरंग अरके, लिंगारेड्डी बोतकुलवार, श्रीपत अर्के, रमेश संकसनवार , स्वामी येलमावार, नवनित येल्टीवार , राजु निम्मलवार , गंगाधर आत्राम, शुभम तुडमवार, मनिष पोतराजवार, राहुल बरपटवार , राकेश गालेवार , विठ्ठल गिज्जेवार, सुरेन्द्र येल्टीवार, जालिन्द्र गोपेवार, श्याम चिंचोलकर , किशोर संदलवार , हरिदास आसुटकर , अशोक शार्लावार, क्रिष्णा कावडे, सुनिल मंदुलवार , कैलास डोहे, विलास रासमवार , किसन कर्णेवार , राजकुमार कुडमेथे , रवि पुल्लीवार , नरसिंग मुत्यलवार ईत्यादी पधादिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page