अजय कंडेवार,Wani:- वणी विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. या ठिकाणी प्रतिनिधीत्व करणाऱ्यांसह अनेक उमेदवारांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या निर्धार करीत इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. त्यातच सर्वानाच वाटू लागले की पक्ष आपल्यालाच संधी देणार, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण करून भेटीगाठी, कार्यक्रमे , उपक्रमेकार्यक्रमाचे उद्घाटनात आवर्जून उपस्थिती आणि प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू केले आहे. असे असले तरी अनेक उमेदवारांना तिकीटाची शाश्वती तेवढ्या विश्वासाने दिसून येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत इच्छुक उमेदवार आपल्या मतदारसंघात वावरू लागला आहे.
विधानसभेचा पंचवार्षिक कार्यकाळ या वर्षात संपुष्टात आला आहे. लोकसभा निवडणूका ऑक्टोबर किंवा नोव्हे महिन्यात जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तविन्यात येत आहे.त्या पाठोपाठ अन्य निवडणुकाही लागणार, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने राजकीय पक्ष व पक्षातील पुढारी ॲक्शन मोडवर आले असून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.भेटीगाठी व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आगामी निवडणुकीसाठी ‘तयार है हम’ असा संदेश देत आहेत. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या रिंगणात पक्ष आपल्यावरच विश्वास दर्शवून उतरविणार, असेही आपल्या सक्रियेतून संधी समर्थक कार्यकर्त्यांसह जनतेला दाखविले जात आहे .
सर्वच राजकीय पक्षामध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणुक लढविण्यास इच्छूक आहेत. मागील निवडणुकीतही एका पेक्षा अधिक निवडणूक लढविणाऱ्यांना आगामी निवडणूक तुमचीच, असे आश्वासन देत पक्षाकडून आदेशाचे पालन करण्याचे सुचना केल्या होत्या. त्यानुरूप या निवडणुकीत पक्ष आपल्याच उमेदवारी देईल, या अनुषंगाने काही इच्छूक प्रतिनिधीत्व करणाऱ्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात उतरल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान आपला मतदारसंघ पिंजून काढण्यास इच्छुक उमेदवार जीवाचे रान करताना दिसून येऊन राहिले आहे.