Ajay Kandewar,Wani:- लोकसभा विधानसभा निवडणूका झाल्या आता नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. वणी शहरात शिंदे गटाने अनेक पक्षाला खिंडार पाडले आहे.बहुतांश एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत करताना दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. अनेक मातब्बर पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यातच माजी जिल्हा प्रमुख व यवतमाळ जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर व वणी शहर प्रमुख ललित लांजेवार यांच्या नेतृत्वात शहरात अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यात अनेकांनी ललित लांजेवार यांचा नेतृत्वाला पसंती दिली आहे. तसेच विनोद मोहितकर यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या व कार्यकर्त्यांमूळे शिवसेनेला उभारी मिळाली असून येत्या नगरपरिषद,जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत वणीत “भगवा ” फडकविणार असल्याचेही सांगितले.
या सोहळ्यात कृष्णा बोढे, साहिल कानकेवार, कैलास पुरी, भाऊराव पारशिवे, राजेश मंचावार, वैभव सिडाम, शुभम चिडे, बबन दांडेकर, यश नागभीडकर, दीपक नागभीडकर,देविदास मुरकुटे, गणेश पारशिवे, सुरेश चिडे, निखिल आडे या शिवसैनिकांनी प्रवेश केला .यावेळी सुनील डोंगरे, संजय तोमस्कर, राहुल उपाटे व गिरीश सातपुते उपस्थित होते.