Monday, April 27, 2026
HomeBreaking Newsरुद्राक्षवनाजवळचा अपघात अन् दोघांचाही मृत्यू.....!

रुद्राक्षवनाजवळचा अपघात अन् दोघांचाही मृत्यू…..!

•निंबाळाजवळील घटना.

Ajay Kandewar Wani:- वणी मारेगाव मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना एकाचा १० जानेवारीला रात्री उशिरा तर दुसऱ्याचा ११ जानेवारीला पहाटे मृत्यू झाला. वणी वरून मारेगाव तालुक्यातील पाहपळ या आपल्या गावी परतत असतांना निंबाळा फाट्याजवळील रुद्राक्षवनाच्या गेट जवळ त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले होते. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. या दोघांनीही शेवटचा श्वास घेतला. विजय संभाजी थेरे वय अंदाजे ३५ वर्षे व नितीन खुशाल पायघन वय अंदाजे २८ वर्षे अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मित्रांची नावे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page