अजय कंडेवार,वणी:– अनेक विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीने जिंकण्याचा दावा सांगितला आहे. यामध्ये वणी विधानसभा मतदारसंघातून एक सुप्रसिद्ध डॉक्टर आणि सर्जन म्हणून ओळख असणारे तसेच मागील 8 वर्षापासून नेहमीच विविध सामाजिक ,राजकीय क्षेत्रात “चाणाक्ष नेता” म्हणून विशेष ओळख असणारे डॉ. महेंद्र अमर लोढा यांनीही “आमदारकी” साठी दंड थोपटले आहेत.त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी “वणी मतदारसंघातून” निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यात काँग्रेसच्या पक्षांच्या वरिष्ठ प्रमुख नेत्यांपर्यंत आपण आपल्या भावना पोहचविल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वणी विधानसभेच्या गहाळ अभ्यासू तसेच प्रत्येक गाव खेड्यात परिचित असे नाव म्हणजे डॉ. महेंद्र लोढा. 8 वर्षाआधी त्यांनी राजकीय भूमिका घेत राजकारणात उडी घेतली.जन्मभूमी पेक्षा कर्मभूमी श्रेष्ठ असे मानणारे फार कमी असतात. परंतु रुग्णसेवेचा वसा घेत आदिवासीबहुल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा आज लोकांसाठी काहीं करण्याची जिद्द मनात बाळगून “आमदारकी ” साठी रिंगणात सज्ज होत “उमेदवारीचा” दावा ठोकला आहे.
.• डॉ.लोढा यांचा कार्याचा पाढा……
1.”स्वतः व लोकवर्गणी गोळा करून वीजपुरवठा सुरू केला. रोजगार मिळावा म्हणून मधूमक्षीपालन व्यवसाय शिकविला. पोडावरील महिला, पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी बारमाही पायपीट करावी लागत होती. गावात नळ कनेक्शन उपलब्ध करून दिले त्यामुळं पोडावरील नागरिकांची पायपीट थांबली. विशेष म्हणजे दिवाळी सण डॉ. लोढा हे पोडावर जाऊनच साजरा करतात. सामाजिक कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना आदिवासी मित्र पुरस्कार दिला होता.आज रोजी डॉ. महेंद्र लोढा यांच्या संपूर्ण मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्यांना या क्षेत्रात असा एकही व्यक्ती नसेल जो त्यांना परिचित नसेल कारण त्यांचा वैद्यकीय क्षेत्रात मोठें नावं डॉ.लोढा यांची विशेष ओळख आहे.गेल्या 8 वर्षांमधील त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याचा मोठा अनुभव देखिल त्यांना आहे. तेजापूर येथे तर लोकसहभागातून त्यांनी पूल ही बांधला होता .त्यांच्या या कार्याची तेव्हा संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली होती.
2.डॉ. लोढा यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात मोफत आरोग्य शिबिरापासून केली.काही काळ लोक सहभागातून “मिशन निर्मल निर्गुडासारखे” उपक्रम राबवीत तृष्णातृप्तीची संकल्पना बाळगणारे हेच ते डॉ. महेंद्र लोढा.या नदी स्वच्छतेच्या कामात झोकून दिल्यावर त्यांनी आपला मोर्चा खेडोपाडी वळविला. त्यांनी शेकडो गावे दत्तक घेतली. त्यातील वरपोड हे गाव १००टक्के कर्जमुक्त केले, तेथे रस्ते, पाणी, अत्याधुनिक शिक्षण आदी सुविधा पुरविल्याने ते एक आदर्श गाव करण्यात आलें.पुढे त्यांनी रस्ते बांधणी, जलवाहिनी टाकणे, गावागावात आरो प्लॅन्ट बसविणे, डिजिटल अंगणवाडी देणे, ‘गाव तेथे वाचनालय’द्वारे वाचनालय काढणे, प्रार्थनास्थळांना सुविधा देऊन त्याला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे, शेकडो गावं दत्तक घेऊन त्या गावांच्या विकासासाठी कार्य केलें.
3.वणी विधानसभा क्षेत्रात गावा गावात जाऊन तेथील जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ लोढा यांनी यांनी कांग्रेसने जनसंवाद यात्रा काढली होती. या काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला वणी उपविभागात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.
4. डॉ.लोढा यांनी अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याचे काम सुरू केले होते. अमरावती विभागातील अनेक बाहेरील जिल्ह्यात स्वतः जाऊन मतदारसंघात मतदानाची नोंदणी केली तर मतदारसंघात वाढही केली. डॉ.लोढा यांचा कामाची वरिष्ठांनी दखल घेतली व डॉ. लोढा यांना पदवीधर मतदार उमेदवारी देऊ केली. माञ स्वतः डॉ.लोढा यांनी काहीं कारणास्तव ती तिकिट नाकारली. परंतु 22 जाने रोज रविवार शेतकरी मंदिर येथे घेण्यात आलेल्या “पदवीधर मेळव्यात प्रदेश अध्यक्ष “नाना पटोले यांनी डॉ. लोढा यांच्या कामाची स्तुती देखिल केली आणि त्याचवेळी जाहिर करण्यात आले की, येत्या काळात “काँग्रेसच्या वणी विधानसभेचे भावी आमदार जर कोणी असेल तर ते डॉ. लोढा राहणार “…असे स्पष्ट सूचक दिले होते .
•वणी विधानसभा मतदाराचे संख्याबळ, काँग्रेस विजयी मार्गावर…..…
“डॉ.लोढा यांना गत विधानसभा निवडणूकीत स्व बळावर 16 हजारापेक्षा अधिक मते मिळाली होती. तेव्हा तर ते एकटेच संघर्ष करीत जनसमुदाय आपल्या पाठीशी ठेवला परंतु आज रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ माजी आमदार हे दोघेही एकत्र आहेत व त्यासोबतच एक मोठा पक्ष त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे मतदाराची आकडेवारीची संख्या ही 50 हजार च्या वर असल्यानं साहजिकच “काँग्रेसचा वाट्याला येत्या विधानसभेत विजय प्राप्त होईल यात शंका नाहींच. त्यामुळे डॉ लोढा यांना उमेदवारी वरिष्ठांनी जाहिर करून वणी विधानसभा कॉग्रेसच्या हाती घ्यावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे “
•ओघ काँग्रेसचा दिशेने कायम….
“नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाला राज्यात चांगले यश मिळाले. या निवडणूकीपूर्वी वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षात चांगलेच इन्कमिंग झाले ह अनेक दिग्गजांचा यांच्या नेतृत्वाच पक्षाने कात टाकून नव्याने उभारी घेतल्याचे दिसते. अशात आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसचे नेते डॉ.लोढा यांनी जोमात कंबर कसताना दिसत आले असून आपली छाप ही ते आगामी निवडणूकीत पाडून दाखवेल असे स्पष्ट दिसत आहे.जर काँग्रेस पक्षाने तिकीट दिली तर वणी विधानसभेचा पुढचा आमदार हा काँग्रेसचा असेल. यात मात्र शंका नाही,असा ठाम विश्वास डॉ.लोढा यांनी बोलूनदाखविले “