Tuesday, April 28, 2026
Homeवणीमोहदा ग्रामपंचायतच्या वतीने दिव्यांगांना सन्मानपूर्वक हक्काचा 5% निधी वाटप.....

मोहदा ग्रामपंचायतच्या वतीने दिव्यांगांना सन्मानपूर्वक हक्काचा 5% निधी वाटप…..

•दिव्यांगांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविले.

अजय कंडेवार,Wani:– तालुक्यातील मोहदा ग्रामपंचायतच्या वतीने गावातील दिव्यांग बंधू भगिनींना ग्रामपंचायत उत्पनातील 5% निधी सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा विशेष उपस्थितीत 27 एप्रिल रोजी सन्मानपूर्वक वितरित करण्यात आले.

यावेळी सर्व दिव्यांग बांधव,प्रतिष्टीत नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तब्बल 16 दिव्यांग लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.यावेळी गावचे सरपंच वर्षा राजूरकर,उपसरपंच सचिन रासेकर सचिव उरकुडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर होते.

जिल्हा परिषद, महानगरपालिका पंचायत समिती, नगरपालिका,ग्रामपंचायत यांनी स्वउत्पन्नातील 5% निधि हा विविध अपंग / दिव्यांग कल्याणकारी योजना यांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य असून तो वेळेत लाभार्थाना वितरित करणे अपेक्षित असताना बऱ्याच वेळा हा निधी वाटप करण्यास टाळाटाळ किंवा दिरंगाई केली जाते.यामुळे आपलं हक्क मागण्यासाठी दिव्यांग बांधव आंदोलनाची भूमिका बजावत रस्त्यावर उतरताना दिसून येतात.ज्यांना हात नाही, पाय नाही, काहींना दृष्टी नाही तर काहींना बोलताही येत नाही ,अश्या दिव्यांग बांधवानाही आपलं हक्क मागण्यासाठी आंदोलन करावे लागते ही खूप खेदजनक बाब आहे.परंतु वणी तालुक्यातील मोहदा ग्रामपंचायतीच्या दिव्यांगांना धनादेश वाटप केले या उपक्रमाचा इतर ग्रामपंचायतीनेही आदर्श नक्कीच घ्यावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page