Ajay Kandewar,Wani:-वणी उपविभागातील निविदा झालेले व कार्यारंभ आदेश झालेले कामे तात्काळ सुरू करून तसेच काहीं कंत्राटदार कामामध्ये हलगर्जीपणा करीत आहे त्यांचे परवाने देखील रद्द करण्याकरिता शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग वणी येथील उपविभागीय अभियंता यांना निवेदनातून थेट इशारा दिला.
वणी उपविभागातील ज्या रस्ता बांधकाम निविदा होऊन कार्यारंभ आदेश आले आहे अश्याप्रकारचे कामें तात्काळ सुरू झाले पाहिजे व मागील 2 वर्षापासून झालेली काहीं कामे याची देखरेख होणे हेही तेव्हढेच महत्वाचे आहे.अश्या सर्व कामांची चौकशी करून रस्ते दुरुस्त करण्यात यावे आणि शासकीय कामं दिलेले कंत्राटदार जर दिलेल्या कामाची देखरेख व विहीत कालावधीत दुरूस्ती करत नसेल तर अश्या कंत्राटदाराचे सरळ परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव तात्काळ वरिष्ठांकडे पाठवून त्यांना सक्ती कारवाई करण्यात यावी. अशी जोरदार मागणी शिवसेनेने केली आहे.
कारण काहीं रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरीकांना मार्ग भ्रमण करणे अवघड होत आहे. परीनामी अपघात वाढले आहे. त्यामुळे यात होणा-या जिवीत हाणीनी जबाबादरी संबंधीत कंत्राटदार व आपले विभागावर राहील,रस्त्यावरील धुळीमुळे रस्ता लगत शेतक-यांच्या शेतातील पिके प्रदुषणाने उद्वस्त होत आहे. तरी या सर्व प्रकाराची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी. यात१) शिरपुर वे आभई फाटा, २) शिंदोला ते कळमाना, ३) शिंदोला ते कोलगांव ४) वणी ते नांदेपेरा -मार्डी ५) वणी-पुरड- घोन्सा तसेच इतर सर्व रस्ता मुकूटबन ६) वेळाबाई -मोहदा-पुरड ७) वणी बांधकाम विभागाने येत्या १५ दिवसात कामे करावे अन्यथा shivsenastyle ने आंदोलन करण्यात येईल. निवेदन देताना यावेळी सुधीर थेरे, विलास बोबडे, प्रवीण खानझोडे, आनंद घोटेकर, ज्ञानेशवर बोबडे आदि उपस्थित होते.