Wednesday, July 22, 2026
HomeBreaking NewsCoal किंग "हाजी"चा Murder....!

Coal किंग “हाजी”चा Murder….!

•आरोपी सरेंडर झाल्याची विश्वसनीय माहिती समोर

अजय कंडेवार,Wani:- चंद्रपूर शहरातील बिंनबा गेट परिसरामध्ये असलेल्या शाही दरबार या हॉटेलमध्ये जेवण करत असताना हाजी अली नामक इसमावर अज्ञात आरोपीनी गोळ्या झाडल्याने गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

प्राप्त माहितीनुसार घुग्घुस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर अली हे बिनबा गेट जवळील शाही दरबार या हॉटेलमध्ये जेवण करीत असतांनाच अचानक हाजी अली यांच्यावर हल्ला केला त्यात हाजी अली पळून जाण्यासाठी धावले मात्र आरोपींनी आपल्या बंदुकीने त्यांच्यावर वार केला.

हाजी अली याचे नुकताच कारागृहातून सुटका झाल्याचे कळते, हाजी अली यांची मागील पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून अवैध कोळसा व्यापारात त्याचा फार मोठा दरारा होता.  हाजी अलीची हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचे सांगितले जात आहे. या हत्येनंतर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page