अजय कंडेवार,वणी: तालुक्यातील राजूर गावात आरोग्य तथा ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे गावात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून, गावात15 दिवसाआधी एकाला डेंग्यूची लागण झाल्याने गावातीलच एका खाजगी दवाखान्यात कळल्याने ग्रामवासीयात खळबळ उडाली होती, त्यानंतर आज रोजी आणखी एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे आढळले तरीही राजूर आरोग्य विभाग व गावातील ‘मोठी म्हणणारी’ ग्रामपंचायत याकडे स्पष्ट दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच याबाबत प्राथमिक रुग्णालयाचे डॉक्टर यांना प्रतिनिधींनी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन घेणे टाळले. यावरून स्थानिक डॉक्टरचा हलर्जीपणा स्पष्ट लक्षात येते .डॉक्टर 24 तास सेवेसाठी असतात की झोपेसाठी हा देखिल सवाल उपस्थित झाला आहे. या चित्रावरून असेही आढळले की, राजूर प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडल्याचे स्पष्ट चित्र निर्माण देखिल झाले आहे.
मागील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या तसेच राजूर गावात घाण पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे गावात डासांची संख्या वाढत आहे. त्यातून अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे. आता झिका विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या बालकांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. परंतु, या बाबीकडे आरोग्य यंत्रणा यांचे बॉस “डॉक्टर” सपेशल फेल ठरत आहे.विशेष उपाययोजनेत ग्रामपंचायतचेंही दुर्लक्ष करीत आहे. आजगत अनेक रुग्ण तापाने फणफणत असून, खासगी व शासकीय रुग्णालयात रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे यासंदर्भात आरोग्य व ग्रामपंचायत विभागाने दखल घेणे गरजेचे आहे.गावात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे कचरा मोठया प्रमाणात रस्त्त्यावरच पडलेल्या अवस्थेत आहे.त्यामुळे या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत आहे. त्यातून गावागावात डेंग्यूचे रुग्ण वाढत चालले आहेत. लहान बालकांमध्ये डेंग्यूचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येत आहे. डेंग्यूचे पहिले लक्षण ताप असल्याने विषाणूजन्य ताप समजून उपचार करण्यात येत आहेत. याकरीता ग्रामपंचायतने केलेली अति पानीयुक्त धूर फवारणी केली ते नाममात्र दिसून आली. कारण परत रुग्ण सापडल्याने सिध्द झाले.
स्थानिक डॉक्टर रुग्णांचे फोन उचलण्यात असमर्थता….
“प्रतिनिधीने स्थानिक शासकिय डॉक्टर यांना माहिती करीता फोन केला असतां, अवघे 9 तासानंतरही कॉल बॅक करण्याकरीता डॉक्टरांना वेळ नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले. यावरून डॉक्टर 24 तास सेवेसाठी असतात की झोपेसाठी… सामान्यांना हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.”आणि स्पष्ट डॉक्टरांचा हलगर्जीपणा दिसून आला. कारण प्रतिनिधी अनुत्तरीत असते मग, सामान्य जनतेचे काय ?यावर वरिष्ठ काय कारवाई करतात त्यांना कोणता सल्ला देतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.”