Thursday, December 4, 2025
HomeUncategorized"चंद्रपूर लोकसभा" निवडणूक यंदा "ग्रामपंचायतीच्या" निवडणुकीसारखीच.....

“चंद्रपूर लोकसभा” निवडणूक यंदा “ग्रामपंचायतीच्या” निवडणुकीसारखीच…..

• अहिर समर्थक वर वरच "भाऊंचा" सोबती ? • चंद्रपूर लोकसभेचा मागिल "साळे चार वर्षाचा विकास" जनता पाहणार ?

अजय कंडेवार,Wani:- चौकाचौकात, कट्टयाकट्ट्यावर सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत कमालीची बदललेली राजकीय समीकरणे, आरोप- प्रत्यारोपांमुळे चांगलाच रंगू लागला आहे. उमेदवारी जाहीर होताच ग्रामीण भागात कट्टर कार्यकर्ते ढवळून निघाले आहे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता अंग झाडून कामाला लागला आहे. हा निवडणूक ज्वर आता गावोगावी पहावयाला मिळत आहे. Behind the Chandrapur Lok Sabha, will the public discuss “four years of development”

चौकाचौकात व कट्ट्याकट्यावर सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने राजकीय अंदाज मांडत आहे. जो तो समर्थक आपलाच पक्ष कसा चांगला आहे व आपला उमेदवार कसा निवडून येऊ शकतो, हे ठासून सांगत आहे. त्यामुळे गावागावांतील वातावरण निवडणूकमय बनले. परंतु मागील चंद्रपूर लोकसभेचा मागिल “साळे चार वर्षाचा विकास” जनता पाहणारच यात शंका नाही. यावरही गावखेड्यात मतदान होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

आतातरी “ताई “की भाऊ यावर विचारमंथन मतदाराने करणे गरजेचे आहे. विशेषतः चंद्रपूर लोकसभेत किती युवकांना रोजगार मिळाला. किती विकास झाला यावर गावगाड्यात चर्चा देखील जोमात सुरु आहे. काहींची सोशल मीडियाची “हव्वा” आणि तर काहींची मतदारांचा मनात जागा बनवून बसलेले उमेदवार यांचा गाजावाजा गावकट्ट्यावर रंगू लागली आहे.

सोशल मीडिया, फेसबुकच्या माध्यमातून गावागावांत, वाड्यावस्त्यांवर इलेक्शनचे वारे दिसत आहे. काहिशी निरस वाटणारी लोकसभा निवडणूक यंदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीइतकी महत्त्वाची ठरू लागल्याचेच दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments