अजय कंडेवार,Wani:- कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलीचा मोठ्या पाण्याचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी मोहडा (वेळाबाई)ता. वणी ,जि. यवतमाळ शिवारात घडली. विद्या अनील आडे (१५ )असे मृत मुलीचे नाव आहे. The big pits in the quarry turned out to be fatal.
मोहदा (वेळाबाई) येथील विद्या आडे ही मुलगी बुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास गावच्या शिवाराती एका मुलीसोबत खदानीचा मोठ्या खड्ड्यात कपडे धुण्यासाठी गेली होती. परंतु, अचानक तिचा पाण्यात तोल गेला असता ती त्या खड्ड्यात बुडाली. यावेळी सोबत असलेल्या मुलीने आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी व आजू बाजूला असणाऱ्या काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. लगेचच गावकऱ्यांनी पो.स्टे शिरपुर ला माहीती दिली असता, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तो मृतदेह बाहेर काढून पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे सायंकाळी ५ वाजताचा सुमारास दाखल केले .सदर मृतदेह शवविच्छेदन होवून मॄतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास शिरपूर पोलिस करीतआहे.