Monday, September 14, 2026
HomeUncategorizedBJP वणी शहर तर्फे ‘बाप्पा माझा’ स्पर्धेचे आयोजन....

BJP वणी शहर तर्फे ‘बाप्पा माझा’ स्पर्धेचे आयोजन….

Ajay,Wani  : गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी वणी शहरच्या वतीने ‘बाप्पा माझा स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत घरगुती गणपतीसाठी ‘अ’ गट, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘ब’ गट करण्यात आला असून, स्वदेशी वस्तूंचा वापर किंवा पर्यावरण संवर्धन यापैकी एका विषयावर देखावा सादर करणे आवश्यक आहे.

दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी १६ सप्टेंबरपर्यंत आयोजकांनी दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप अथवा फोनद्वारे नोंदणी करावी. नोंदणी करताना घराचा किंवा गणेशोत्सव मंडळाचा संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी झाल्यानंतर १७ ते २३ सप्टेंबरदरम्यान आयोजक व परीक्षक प्रत्यक्ष भेट देऊन देखाव्याचे परीक्षण करतील. स्पर्धा वणी शहर व लगतच्या गावांपुरती मर्यादित असून, दोन्ही गटांतील निवड झालेल्या प्रत्येकी २० नोंदणींचे परीक्षण केले जाणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.

या उपक्रमात नागरिक, गणेशभक्त व गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि भाजप वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांनी केले आहे. स्पर्धेचे संयोजक मनोज सरमुकदम असून सहसंयोजक म्हणून गणेश आसूटकर, बालाजी भेदोडकर, उमेश गंधारे, डॉ. नीलिमा दवणे, वैशाली वातिले, आरती गणेश वांढरे, संगीता मेश्राम, प्रिती बिडकर आणि पूजा रामगिरवार कार्यरत आहेत. इच्छुकांनी पोस्टरवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page