अजय कंडेवार,Wani:- लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडी सध्या जोरात दिसत आहे. त्यामुळे आघाडीचा कॉन्फिडन्स (confidence ) चांगलाच वाढला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखण्यास सुरुवात केली.सर्वसामान्य नागरिक शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्पर राहिले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत नागरिकांचा मिळालेला जनाधार अधिक भक्कम करण्यासाठी सर्वसामान्य जनतेत जाऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडा, शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मतभेद विसरून एकदिलाने व एकजुटीने कामाला लागा असे निर्देश माजी केंद्रियमंत्री शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी हॉल येथे घेण्यात आली. यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधले. या बैठकीला विश्वास नांदेकर ,वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर ,दिपक कोकास,संजय निखाडे, ठाकरे,संतोष माहुरे, संजय आवारी, अजिंक्य शेंडे,थेरे,सतीश आदेवार ,अशोक पधरे,दुष्यंत उपरे, बालू दुधकोहळे ,विजय पणघंटीवार, दयाकर गेडाम, लोकेश बोबडे, विठ्ठल बोंडे,संजय देठे, विनोद धुमणे,जगन जूनगरी अजय कौराशे, समीर लेनगुरे, प्रशांत बलकी ,रवी बोधेकर,सरफराज बादलवार हे उपस्थित होते.
इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी…..
“शिवसेना पक्षाच्या वतीने विधानसभेत उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार शक्ती प्रदर्शन करताना सुद्धा पाहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या समर्थकांसह हजर होते.”