अजय कंडेवार,Wani:- तालुक्यांतील शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेला ग्राम चिंचोली येथे 6 ते 7 इसम चिंचोली फाटा परीसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना शिरपूर पोलिसांनी शिताफीने सात जणांना अटक केली.1) अनिल कल्लू निशाद ( 27 वर्ष) 2) सुनिल कल्लू निशाद (30 वर्षे) दोन्ही रा. रामनगर, शास्ती राजूरा ता. राजुरा जि. चंद्रपुर 3) निलेश मनोहर बावणे (25 वर्ष) रा. मुंगोली ता. वणी जि. यवतमाळ 4) एक विधीसंघर्ष बालक, 5) बंडल निषाद (28 वर्षे) रा. रामनगर, शास्ती राजुरा ता. राजुरा जि. चंद्रपुर 06) प्रफुल चौधरी (25 वर्षे) रा. घुग्गुस ता.जि. चंद्रपुर 7) संकेत भौजेकर (21 वर्ष) रा. एकोडी ता. कोरपणा जि. चंद्रपुर . या ताब्यात घेतलेल्या इसमांवर शिरपूर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री ही धाडसी कारवाई केली .या आरोपींकडून लोखंडी रॉड, आरी पत्ता, पेन्चिंस, पेचकस ईतर साहित्य जप्त करण्यात आली आहे.Madhav Shinde’S Ratta..Shirpur police foiled the robberies Plan
सविस्तर वृत्त असे की ठाणेदार माधव शिंदे यांना सोमवारी गुप्त माहीती मिळाली त्या आधारावर दि.15 रोजी मध्यरात्री पेट्रोलिंगवर काहीं अधिकारी व कर्मचारी असतांना ठाणेदार माधव शिंदे यांनी थेट पेट्रोलिंगवर असणाऱ्याना आदेश दिले की,ग्राम चिंचोली परीसरात मध्ये 6 ते 7 इसम चिंचोली फाटा परीसरात दरोडा घालण्यासाठी दबा भरुन बसुन आहे. यावरून त्याठिकाणी शिरपूर पोलिस मोक्का पाहणी करताना त्यांना काहीं इसमांवर संशय येताच ,त्यां टोळीचा पोलिसांनी घेराव केला व त्यांना शिताफीने पकडले. त्या पकडलेल्यांचे नावे 1) अनिल कल्लू निशाद वय 27 वर्ष 2) सुनिल कल्लू निशाद वय 30 वर्षे दोन्ही रा. रामनगर, शास्ती राजूरा ता. राजुरा जि. चंद्रपुर 3) निलेश मनोहर बावणे वय 25 वर्ष रा. मुंगोली ता. बणी जि. यवतमाळ 4) एक विधीसंघर्ष बालक, फरार आरोपी नामे 5) बंडल निषाद वम अं.28 वर्षे रा. रामनगर, शास्ती राजुरा ता. राजुरा जि. चंद्रपुर 06) प्रफुल चौधरी वय अं.25 वर्षे रा. घुग्गुस ता.जि. चंद्रपुर 7) संकेत भौजेकर बय अं.21 वर्ष रा. एकोडी ता. कोरपणा जि. चंद्रपुर हे दरोडा घालण्यासाठी एकत्रित येउन दरोडा घालण्याची पुर्वतयारी करतांना मिळून आले सदर आरोपीतांकडून दरोडा साहित्य ( लोखंडी रॉड, आरी पत्ता, पेन्चिंस, पेचकस ईतर) कि.अं.42170 रु व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन क्रमांक MH -09 BM -0133 कि.अं.2 लाख रु असा एकुण 2 लाख 42 हजार 170 रु चा मुद्देमाल आरोपीतांकडून घटनास्थळ जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करुन त्यांचेवर कलम 310(4),310(5) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरु केला.
ही सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड , अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश किन्द्रे, रामेश्वर बैंजणे, एलसीबी पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांचा मार्गदर्शनाखाली पो. स्टे शिरपुर येथील ठाणेदार माधव शिंदे व इतर शिरपूर अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली .