अजय कंडेवार,Wani:- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने विद्यमान आमदारांवर पुन्हा विश्वास टाकला आहे. सलग तिसऱ्यांदा वणी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारी देत यादीतल्या पहिल्या ३१ व्या क्रमांकावरच उमेदवारी जाहिर केली.परंतु काही ठिकाणी विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. Announcement of name Sanjivareddy Bodkurwar from Vani Legislative Assembly.
वणी मतदारसंघात उमेदवारीवरून मोठा संघर्ष दिसून आला. यांच्याबद्दल उमेदवारीवरून काही किरकोळ झालेला वाद समोर आला होता. मात्र वरिष्ठांनी जनतेचा विश्वास पाहून बोदकुरवार यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा केला .यात त्यांच्या नावाची आज भाजपकडून घोषणा करण्यात आली आहे. याठिकाणी आता महाविकास ाघाडीकडून कुणाला नेमकी संधी दिली जाईल. ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे
दरम्यान, वणी विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा संजीवरेड्डी यांच्यावर विश्वास टाकला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बोदकुरवार यांनी मतदारसंघ बांधून ठेवला, अनेक कामे केली, जनतेचा सेवेत नेहमीच अग्रेसर राहिले आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक विकासात्मक कामे केली आहेत. पक्ष संघटना देखील मजबूत करण्याचे काम केले आहे. त्याचेच फलित म्हणून त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांनी वरिष्ठ नेत्यांचे आभार देखील मानले आहेत
•बोदकुरवार यांनी मानले आभार…

“भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वणी विधानसभा मतदार संघ पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीकरीता भाजपा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी मिळाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या यादीत माझ्या नावाची घोषणा केली. याबद्दल पक्षश्रेष्ठींचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व आणि ‘शाश्वत विकास’ हा अजेंडा घेवून आम्ही लोकांसमोर जात आहोत. या निवडणुकीत भाजपा परिवारातील सर्व घटकांचे सहकारी, महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या सोबतीने विजयी शंखनाद होईल, असा विश्वास संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केला आहे.