Vidharbh News -अजय कंडेवार,Wani:- अल्पवयीन मुलींचे घरून बेपत्ता होण्याचे प्रमाण तालुक्यात चांगलेच वाढले आहे. अल्पवयीन मुलींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना फूस लावून पळवले जात आहे. आई वडिलांचा विश्वास धुळीस मिळवून त्यांच्या न कळत अल्पवयीन मुली घरून पलायन करू लागल्या आहे. शिक्षण घेण्याच्या वयात मार्ग भटकू लागल्या आहेत. कुणाच्याही भूलथापांना बळी पडून चुकीच्या मार्गाकडे वळू लागल्या आहे. आयुष्य घडवण्याच्या वयात आयुष्य उध्वस्त करू लागल्या आहे. गाव खेड्यातील व गरीब घरातील मुली घरून पळून जाण्याच्या घटना चांगल्याच वाढल्या आहे. अश्यात शनिवार ३० मार्चला शिरपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील 2 अल्पवयीन शाळकरी मुली कुणालाही न सांगता बेपत्ता झाली. मैत्रिणीला बाहेर भेटून येतो असं सांगून बाहेर जाऊन सायंकाळ पर्यंत परतलीच नसल्याने याबाबत तिच्या वडिलांनी शिरपूर पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने शिरपूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला.Shirpur police Station.(2 minor girls missing and 2 youths arrested in just a few hours.Performance of Shirpur Police.)
शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल होताच ठाणेदार API माधव शिंदे यांनी किंचितसाही विलंब न करता या प्रकरणाची धुरा PSI बुधवंत यांचा हाती देत एक पथक तयार केले , स्पेशल पथक शोध घेण्यास निघाले असता, त्या पथकांनी काही संशयिताचे मोबाईल लोकेशन द्वारे अवघ्या काहीं तासातच गडचांदुर( राजुरा ) येथून त्या दोन्ही अल्पवयीन मुलींचा शोध घेतला व त्यांना फुस पळवून नेणाऱ्या दोन मुलांनाही ताब्यात घेतले.PSI बुधवंत व पथकांनी शिरपूर पोलीस स्टेशन येथे आणले व दोन्ही मुलीने दिलेल्या बयानावरून राहुल मडावी (24) व निखील शिडाम (23) दोघे रा. ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर यांच्याविरोधात 363 ,376(पोस्को) या कायद्यानुसार शिरपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Shirpurpolice
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, SDPO गणेश कींद्रे यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलीस स्टेशन ठाणेदार API माधव शिंदे यांच्या सुचनेने PSI बुधवंत व शिरपूर पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.