Vidharbh News –अजय कंडेवार,Wani:- रमजान ईद,श्रीराम नवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढीपाडवा व लोकसभेचा पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक 2 एप्रिल 2024 मंगळवार रोजी सायं.ठीक 7 वाजता आउटपोस्ट पोलीस चौकी राजूर कॉलरीचा प्रांगणात संपन्न झाली.In the background of the upcoming festival, the meeting of the peace committee was concluded
या बैठकीचा अध्यक्षस्थानी वणी पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले ठाणेदार अनिल बेहरानी होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच पेरकावार, गावातील ज्येष्ठ अशोक वानखेडे, समाजसेवक संजय सिंग, ऍडव्होकेट चालखुरे,ग्रा.पंचायत सदस्य हे उपस्थित होते.
याप्रसंगी वणी ठाणेदार अनिल बेहरानी यांनी गावातील नागरिकांचे कौतुक केले कारण येथील सर्व समाज बांधव एकोप्याने सर्व सण उत्सव साजरे करतात पण शांतता भंग होणार नाही याची दक्षता सर्व समाजबांधव व नागरिकांनी घ्यावी असे आवाहन केले.इतकेच नव्हे तर पोलीस प्रशासनाकडून सहकार्याची भूमिका राहील असेही आश्वासीत केले. येत्या रमजान,श्रीराम नवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढीपाडवा व लोकसभेचा पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये,शांतता, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस पाटील व नागरिकांनी सजग रहावे. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना माहिती द्यावी यासाठीही सूचना केल्या.तसेच लोकसभा निवडणूकीचे वातावरण संपूर्ण देशात आहे. अशावेळी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे सर्वाकडून पालन व्हावे, कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, सर्वत्र शांतता कायम ठेवावी, असे आवाहन वणी ठाणेदार अनिल बेहरानी यांनी राजुर गावकऱ्यांशी केले.
यावेळी गावातील ज्येष्ठ, समाजसेवक,विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध उत्सव समितीचे अध्यक्ष व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचा यशस्वीतेसाठी राजूर बीट प्रमुख API दत्ता पेंडकर, ASI शेखर वांढरे,जमादार अविनाश, जमादार अमोल अंन्नेरवार आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.