Vidharbh News -अजय कंडेवार,Wani – लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटनासाठी वणी शहरात आगमन होताच स्थानिकचौकात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन प्रचार कार्यालयाचे उद्घाटन 1 एप्रिल रोजी करण्यात आले तसेच शेतकरी मंदिर येथे कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना,आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते संवाद बैठक घेण्यात आली.Just fooled the common people, think seriously and change the power at the center – Pratibhatai Dhanorkar.
मागच्या १० वर्षांकडे पाहताना आपल्याला केवळ वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, वाढते महिला अत्याचार, अस्वस्थ शेतकरी बांधव, शेतकरी आत्महत्या याच समस्या प्रामुख्याने दिसतात. निवडून येण्यासाठी भाजपने जी आश्वासने दिली ती अद्याप पूर्ण झाली नाही. केवळ सर्वसामान्य जनतेला फसवले गेले. त्यामुळे आता गांभीर्याने विचार करून केंद्रात सत्ता परिवर्तन करण्याची वेळ आली आहे. म्हणून मी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पाठीशी उभे राहून मला भारताच्या सर्वोच्च सभागृहात आपली सेवा करण्याची संधी द्यावी त्यासाठी पहिल्या क्रमांकाचे बटन दाबून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन याप्रसंगी बोलताना प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.
प्रतिभा धानोरकर यांचे वणी तालुका प्रचार कार्यालयाचे 1 एप्रिल रोजी दुपारी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कांग्रेसचा पार पडलेल्या कार्यकर्ते संवाद कार्यक्रमात आमदार सुभाष धोटे, संजय खाडे मा.आमदार वामन कासावार, मा.आमदार विश्वास नांदेकर,देविदास काळे,विजय नगराळे, डॉ.महेंद्र लोढा, टिकाराम कोंगरे , गीत घोष, तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे,यांचेसह कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना,आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,