अजय कंडेवार,Wani:- वणी विधानसभेतील समस्त शेतकऱ्यांना संपुर्ण बिलमाफी देण्यात यावी तसेच घरगुती विज वापर धारकांना २०० युनीट विज मोफत मिळावी, यासाठी देशाचे प्रधानमंत्री यांना १ लाख १६ हजार १६ स्वाक्षरी पाठविण्यासाठी वणी विधानसभा प्रमुख (शिवसेना उबाठा) व उपाध्यक्ष-जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ तथा अध्यक्ष-वणी नागरी सह. बँक संजय देरकर यांचा नेतृत्वात “आता हे चालणार नाही…। स्वाक्षरी अभियान” या स्तुत्यमय उपक्रमाचा “भव्य शुभारंभ” सोमवार १७ जुन २०२४ ,दुपारी १२.०० वाजता जिल्हा मध्यवर्ती बँक मर्या. यवतमाळ, वणी येथे करण्यात आले आहे.Get 200 units of electricity for free, “My electricity…My responsibilty.
@काय आहे वणी विधानसभा जनतेचा मागण्या:
१) सर्व शेतकऱ्यांना संपुर्ण बिलमाफी देण्यात यावी.२) घरगुती विज वापर धारकांना २०० युनीट विज मोफत मिळावी.३) २०० युनीट वरील विज प्रति युनिट २.५० रु. दरात देण्यात यावी.४) लघु उद्योग व कुटीर उद्योगांना स्वस्त सवलतीच्या दरात विज द्यावी.५) झरी व मारेगांव तालुक्यात १३२ के. वी. युनिट झाले पाहीजे.६) आंध्रप्रदेश मध्ये ज्याप्रमाणे सोलर पॅनल वर ९०% सवलत आहे त्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेला सवलत देण्यात यावी.७) शेतकऱ्यांच्या शेतपंपासाठी तात्काळ विज कनेक्शन द्यावे.
@ विज सवलत का देण्यात यावी…?
१) विज निर्मिती पाच हजार मेगावॅट विज निर्माण करणारे आम्ही.२) आपली जमीन आपला कोळसा आपलेच पाणी तरी सर्वाधिक विज दर आपल्यालाच का?३) विज निर्मितीमुळे होणाऱ्या प्रदुषण, आजार, अपघात, त्वचारोग आदि अनेक समस्या सहन करणारे आम्ही.४) लोडशेडींग कमी दाबाची विज, अधिक विजबील व इतर अधिभारच्या माध्यमातुन बिलामध्ये जनतेची लुट.५) दिल्लीत मोफत तर महाराष्ट्रात का नाही ?
आता हे चालणार नाही…। म्हणुन स्वाक्षरी अभियानाचा माध्यमातून संताप व्यक्त करण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ लाख १६ हजार १६ स्वाक्षरी पाठवून आपली रास्त मागणी पूर्ण करूया त्याकरिता वणी विधानसभेतील जनतेनी “स्वाक्षरी अभियानात” सामील व्हावे, असे आवाहन वणी विधानसभा प्रमूख संजय देरकर यांनी केले.