अजय कंडेवार,Wani :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत सोबत आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह बघून, देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएच्या ‘अब की बार चारसो पार’मध्ये आपल्या मतदारसंघाचाही समावेश असणार आहे, याची खात्री पटली आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी (सोमवारी ) येथे व्यक्त केला.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचे आज प्रथमच आगमन झाले. दुपारी साडेबाराच्या सुमारात नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले तेव्हा शेकडो कार्यकर्ते आणि चाहत्यांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. यावेळी ‘सुधीर भाऊ आप आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. नागपूर विमानतळावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, संदीप धूर्वे, चंदन सिंग चंदेल, हरीश शर्मा,राहुल पावडे, राजू कक्कड, देवराव भोंगळे, अण्णासाहेब पारवेकर, आनंद वैद्य, डहाके, हितेश परचाके, रवी बेलूरकर आदींची यावेळी उपस्थिती होते