Monday, May 4, 2026
HomeBreaking Newsउपविभागात समस्यांचा डोंगर अन् संजय खाडे आक्रामक.....

उपविभागात समस्यांचा डोंगर अन् संजय खाडे आक्रामक…..

•आज तहसीलसमोर "एकदिवसीय धरणे आंदोलन"

अजय कंडेवार,Wani:– वणी शहरात भीषण पाणी समस्या, वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा,शेतक- यांचे विविध प्रश्न इत्यादींवर वणीत आज गुरुवार १३ जून रोजी तहसील कार्यालयासमोर संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसचे एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाला तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी, काँग्रेस समर्थक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे,असे आवाहन कॉंग्रेस वणी विधानसभा तर्फ करण्यात आले आहे. Mountain of problems in subdivision and Sanjay Khade aggressive

वणी शहरात रांगणा भुरकी येथील वर्धा नदीवरून पाणी पुरवठा होत आहे, परंतु ही योजना कुचकामी ठरली आहे, त्यासाठी कायम स्वरूपी विहिरीचे बांधकाम करून ह्या योजननेला तात्काळ एक्सप्रेस विद्युत फिडर जोडण्यात यावे, अद्यावत फिल्टर प्लांट व अतिरिक्त स्टोरेज टैंक उभारण्यात याव्यात, वणी शहरात व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा यावा. कृषी पम्पाला ८ तासा ऐवजी दिवसा १२ तास वीज पुरवठा करावा. पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.

शेतकऱ्यांना शेती उपयोगी बियाणे, खते व औषध यांचे वाढलेले दर कमी करून त्यांना करमुक्त करण्यात यावे व त्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना अविलंब करण्यात यावा. शेतकऱ्यांसाठी बैंक मार्फत तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, वणी शहराभोवताल वाढलेले प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे लावावी व प्रभावी उपाययोजना कराव्या. वणी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा त्वरित देण्यात यावा. बंद पडलेले ट्रामा केअर सेंटर तात्काळ सुरु कराव्यात.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page