अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन (Shirpur Police Station) हद्दीतील कायदा सुव्यवस्था (Law & Order) अबाधित राहण्यासाठी पथकाकडून हद्दीत गस्त (Police Patroling) घालण्यात येत आहे. दरम्यान शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार API माधव शिंदे (Madhav Shinde) व कर्मचाऱ्यांनी एक दमदार कामगिरी करत तब्बल 5 लाखाचा वर एकूण मुद्देमाल जप्त करण्यात शिरपूर पोलिसांना यश मिळाले आहे.Shirpur Thanedar “Shinde” busted, One tractor seized.
मागील काळात लोकसभा निवडणूकीचा गैरफायदा घेत वाळू चोरांनी पैनगंगा नदी पात्रातून सुमार वाळू उपसा केल्याचे समोर आले होते. शिरपूर पोलिस व महसूलच्या पथकाने वाळू चोरट्यांविरूध्द कारवाई करण्याची मागणीही होत होती. त्याची दखल घेत शिरपूर पोलिसांनी 12 जून रोजी 2.30 वाजताचा सुमारास विना परवाना बेकायदेशीर रित्या गौण खनिज (रेती) चे पैनगंगा नदी पात्रातुन उत्खनन करुन वाहतुक करतांना सतिश देवीदास काकडे (32 वर्षे) रा. ढाकोरी, ता.वणी, जि. यवतमाळ हा व्यक्ती त्याचा ट्रॅक्टरसह आढळला. तो लाल रंगाचा ट्रॅक्टर क्र. MH-29 BC-4173 या ट्रॅक्टरच्या ट्राली मध्ये अंदाजे 1 ब्रास रेती किंमत 4 हजार रु.चा रेती ऑन द स्पॉट मिळून आली त्या सतीश जवळून एकुण 5, लाख 4 हजार/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन व्यक्तीविरुध्द कलम 379 नुसार वणी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून भा.द.वी. सहकलम पर्यावरण संरक्षण अधिनियम 15, सहकलम महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड,अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश किंद्रे यांचा मार्गदर्शनात शिरपूर ठाणेदार सहा. पोलीस निरीक्षक माधव शिंदे व पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
.