अजय कंडेवार,वणी : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे , यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर व किरणताई देरकर यांच्या नेतृत्वात शिवसेना व युवासेना तर्फे वणी शहराचे आराध्यदैवत श्री रंगनाथ स्वामी मंदिरात आरती पुजन, अभिषेक करून देवाकडे साकडे घातले की, “शेतकरी सुखी तर देश सुखी” देशाचा पोशिंदा हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे , त्यांच्यावर येणारे प्रत्येक संकट दूर करण्यासाठी आणि त्यांच्या शेतीमालासाठी भरभरून पाणी येऊ दे, यासाठी वरुन राज्याकडे साकडे घातले, आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भरभरून भाव मिळावा यासाठी श्री विष्णू देवाकडे प्रार्थना केली आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना पुढील राजकीय सामाजिक क्षेत्रातील वाटचालीसाठी प्रार्थना करण्यात आली. Yuva Sena chief Aditya Thackeray says, “Have a great life.
यावेळी वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर, किरणताई देरकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, सह संपर्क प्रमुख संतोष माहुरे, मा उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास,जिल्हा समन्वयक समीर लेनगुरे, बंडूभाऊ निंदेकर, रवी दुमने, नेताजी पारखी,विजय पानघंटीवार , प्रियांशु कडुकर, तेजस नागतूरे, रोशन काकडे, समीर मून,अजय लांजेवार, भगवान मोहिते, जगन जुनगरी,विनोद दुमने, किशोर ठाकरे, चेतन उलमाले, यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.