Ajay Kandewar,Wani:- शहरात बनावट प्रेस कार्डांचा धंदा “खोटे नामक गँग “द्वारे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा आहे. काहीशे रुपयांत “R.N.I” असे छापलेले कार्ड तयार करून देत असल्याच विश्वसनीय माहिती मिळाली . या कार्डांच्या आधारे काही जण राजकीय बैठक, कार्यक्रम आणि खास ठिकाणी ‘पत्रकार’ म्हणून प्रवेश मिळवत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
अशा खोट्या ओळखीने संवेदनशील कार्यक्रमात प्रवेश करून चुकीची माहिती पसरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे खऱ्या पत्रकारांची प्रतिमा आणि स्थानिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, बनावट कार्ड वाटप करणाऱ्यांवर आणि अशा कार्डांचा वापर करणाऱ्यांवर प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी, माध्यमांनीही या प्रकरणाकडे लक्ष देऊन सत्य बाहेर आणावे, अशी मागणी होत आहे.

