Ajay Kandewar,Wani:-तालुक्यातील पुनवट–कवळशी परिसरातून सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाने पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पर्दाफाश केला आहे. वणी शहरातील काही ट्रॅक्टरधारकांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हा “सोनेरी वाळूचा” धंदा मोठ्या प्रमाणात फोफावला आहे.रात्रीच्या वेळी कव्हर घातलेले ट्रॅक्टर नदीपात्रातून रेती उचलून वणी शहरातील विविध भागांत पोहोचवले जात आहेत. विशेष म्हणजे, या तस्करीच्या मागे वणीतील एका प्रभागातील प्रभावशाली एका नगरातील चोरटी टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.
रात्रभर पुनवट–कवळशी परिसरातून दररोज रात्री हजारो ब्रास रेतीची चोरी होत आहे. शासनाचा करोडोचा महसूल बुडत आहे. व्यवसायात अडथळा ठरणाऱ्या महसूल विभागाचा भोंगळ कार्यप्रणालीने हा व्यवसाय मोठ्या जोमात सुरू आहे अशीही गावकऱ्यात बोंब आहे. एवढेच नाही तर एखादे वेळी रेती तस्कराचे वाहन मिळाले तरी आर्थिक स्वार्थापोटी कुठलीही कारवाही न करता सोडून देण्यात येते असे अनेक प्रकार होत आहे . दरम्यान, रेतीचा बाजारभाव प्रति ब्रास तब्बल ₹९,००० पर्यंत पोहोचला असून, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांनाही हीच दराने रेती विकली जाते, अशी संतापजनक माहिती समोर आली आहे. यावर वनी महसूल प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे अशी आर्त हाक नागरिकांनी दिलेली आहे.

