Sunday, August 2, 2026
HomeBreakingशिंदेसेनेचे यवतमाळात तब्बल चार-चार जिल्हाप्रमुख......

शिंदेसेनेचे यवतमाळात तब्बल चार-चार जिल्हाप्रमुख……

Ajay,Wani शिवसेनेच्या (शिंदे गट) केंद्रीय कार्यालयातून यवतमाळ जिल्ह्यासाठी संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, यवतमाळ जिल्ह्यात तब्बल चार प्रभारी जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये यशवंत पवार (पुसद-दिग्रस विधानसभा), गजानन डोमाळे (यवतमाळ-राळेगाव विधानसभा), राजुदास जाधव (आर्णी-उमरखेड विधानसभा) आणि आशिष खुलसंगे ( प्रभारी (in- charge) जिल्हाप्रमुख – वणी विधानसभा कार्यक्षेत्र) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांच्या स्वाक्षरी असून, या नियुक्त्या पक्षांतर्गत निवडणुका होईपर्यंत लागू राहणार आहेत. अस स्पष्ट टिप देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, इतर बहुतांश राजकीय पक्षांमध्ये वणीसाठी विधानसभाप्रमुख किंवा तालुकाप्रमुख अशी जबाबदारी दिली जाते. मात्र, शिंदेसेनेने वणी विधानसभा कार्यक्षेत्रासाठी केवळ प्रभारी जिल्हाप्रमुखपद निर्माण करून आशिष खुलसंगे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. नियुक्तीपत्रानुसार त्यांचे कार्यक्षेत्र केवळ वणी विधानसभा इतकेच असले तरी जिल्हाप्रमुख असल्याने ही नियुक्ती वणीत उद्देशानेच हा निर्णय घेतल्याचे या नियुक्तीतून स्पष्ट होत आहे.

विधानसभा प्रमुख’ नाहीतर प्रभारी (In-charge)जिल्हाप्रमुख’……

विशेष म्हणजे नवनियुक्त प्रभारी जिल्हाप्रमुखांनी इतर बहुतांश राजकीय पक्षांमध्ये प्रत्येक मतदारसंघासाठी ‘विधानसभा प्रमुख’ अशी संघटनात्मक जबाबदारी दिली जाते. मात्र, शिंदेसेनेने वेगळा फॉर्म्युला राबवत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी थेट ‘प्रभारी(In charge) जिल्हाप्रमुख’ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असावा. अशी पत्रातून “प्रभारी”(In- Charge)या शब्दातून दिसून येत आहे नवनियुक्त प्रभारी जिल्हाप्रमुख आगामी जिल्हा परिषद, जास्तीत जास्त पंचायत समित्यावर शिवसेनेचा भगवा किती ताकदीने फडकवितात की गटबाजी चव्हाट्यावर आणतात आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page