Ajay Kandewar,Wani : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी डिजिटल शाळा, चिखलगाव येथे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समितीची सभा अध्यक्षा अश्विनी धारणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी समितीच्या सदस्यपदी जयंतभाऊ कोहळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवनियुक्त केंद्र समन्वयक संदीप ठाकरे, स्वयंसेवक सोनाली आवारी व संध्या जाधव यांचेही समितीतर्फे स्वागत करण्यात आले. मूल्यवर्धन तासिकेच्या पाहणीसाठी आलेल्या करूणा खैरे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. सभेला गौरकार, चंद्रशेखर देठे, ग्रा. स.सिमा देवाळकर, पल्लवी मोरे, पूजा नेहारे, मुख्याध्यापिका प्रतिमा राखुंडे, शिक्षिका अर्चना बोढे, सविता वरपटकर, संगणक प्रशिक्षक वैष्णवी कुत्तरमारे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
सभेनंतर संदीप ठाकरे व शाळा व्यवस्थापन समितीने सर्व वर्गांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच एसआयआर कामाच्या पाहणीसाठी आलेले वणी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांचे समितीतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, यासाठी संबंधित बांधकाम कंपनीला समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. शाळेच्या विकासासाठी आवश्यक विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णयही या बैठकीत घेण्यात आले.

