Ajay,Wani:- चिखलगावचे उपसरपंच तथा उबाठा गटाचे वणी विधानसभा प्रमुख सुनीलभाऊ कातकडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या महादेव नगरीतील निवासस्थानी दिवसभर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला. महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे नाते जपणारा, सुख-दुःखात धावून जाणारा नेता म्हणून सुनीलभाऊ यांच्यावरील प्रेम या निमित्ताने स्पष्टपणे दिसून आले.
सुनीलभाऊ कातकडे यांनी गेल्या अनेक वर्षांत जपलेला लोकसंपर्क, सर्वसामान्यांशी ठेवलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाण्याची वृत्ती याचेच हे जिवंत उदाहरण असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. अनेकांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला, तर काहींनी प्रत्यक्ष भेट घेऊन गावाच्या विकासासह विविध विषयांवर चर्चा केली. त्यांच्या साधेपणामुळे आणि सर्वसमावेशक स्वभावामुळे प्रत्येकजण त्यांच्याशी आपुलकीने जोडला गेल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.
राजकारणात पद मोठे असणे हीच लोकप्रियतेची एकमेव कसोटी नसते; लोकांच्या मनात स्थान मिळवणे हेच खरे नेतृत्व असते, याची जाणीव या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा झाली. आमदार किंवा खासदारांच्या कार्यक्रमांनाही मागे टाकेल अशी गर्दी एका उपसरपंचाच्या निवासस्थानी पाहायला मिळणे, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे. “जनमानसाचा नेता” ही ओळख केवळ घोषणेत नाही, तर लोकांच्या स्वयंस्फूर्त उपस्थितीतून सिद्ध झाल्याचे चित्र चिखलगावात पाहायला मिळाले.
या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सुनीलभाऊ कातकडे यांचे सामाजिक आणि राजकीय वजन पुन्हा अधोरेखित झाले असून, लोकांच्या मनातील त्यांच्यावरील प्रेम, विश्वास आणि आत्मीयता यांचे हे जिवंत दर्शन असल्याचे अनेकांनी सांगितले. वाढदिवसाच्या निमित्ताने दिसलेला हा जनसागर केवळ शुभेच्छांचा वर्षाव नव्हता, तर लोकांनी आपल्या नेत्यावर व्यक्त केलेला विश्वासाचा आणि स्नेहाचा अनमोल ठेवा होता.

