Monday, April 27, 2026
Homeवणीवणीत भव्य मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद....

वणीत भव्य मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद….

वणी : हिंदूहदयसम्राट वं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त  (ता. 23) ला सकाळी 7 वाजता “ भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे “ आयोजन आमदार संजय देरकर यांच्या मार्गदरशनाखाली युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचे नेतृत्वात करण्यात आले.

या स्पर्धेत मुलामुलींचे ओपन गट मुले/मुली व 16 वर्षा खालील मुले-मुली असे चार गटात विभागणी करण्यात आले होते. मुलांच्या गटातून क्रिश सचिंद्र मिस्त्री याने पहिला क्रमांक पटकावले, दुसरे ओम विश्वजीत गारघाटे तर तिसरे बक्षिस कुणाल विठ्ठल तोडासे व चौथे बक्षिस रोहित दादाजी ढेंगळे यांनी पटकावले आहे. मुलींच्या ओपन गटातून पहिले बक्षीस अंजली देवराव पचारे, दुसरे गायत्री मंगेश खोंडे, तिसरे बक्षीस अस्मिता मनोज वाळके व चौथे बक्षिस आचल संदीप झिले हिने पटकावले. तसेच 16 वर्षा आतील मुलांच्या गटातून निल शंकर नाने याने प्रथम बाक्षिस पटकाविले. दुसरे हसन सय्यद तर तिसरे शिवम भोलेनाथ ओझा, तर चौथे बक्षिस वीर गुलाब तांबेकर यांनी तसेच 16 वर्षा आतील मुलींच्या गटातून प्रथम बक्षिस वैष्णवी दिनेश मेश्राम, दुसरे श्रुती बापूराव मडावी, तर तिसरे बक्षिस शिल्पा लक्ष्मण आत्राम, चौथे बक्षिस प्रांजली विलास डोहे यांनी पटकावले आहेत.

यावेळी विजेत्यांना रोख रक्कम देऊन स्पर्धेमध्ये सर्वात लहान धावपटू मुले व नाझिया मिर्झा ऑल इंडिया चॅम्पियन औरंगाबाद यांना पारितोषिक व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान,वणी शहरातील स्केटिंग स्पर्धकांनी स्केटिंग चे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी त्यांचे शिवसेना युवासेनेकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

विदर्भ कन्या स्केटिंग मास्टर मनस्वी चा सत्कार 

तरुण पिढीला संदेश व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकरिता विदर्भ कन्या स्केटिंग मास्टर ही बोटोणी ते वणी हे 30 किमी अंतर स्केटिंग करत वणी शहरात साडे अकरा वाजता वं. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे दाखल झाली. तिचं युवासेने च्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, हिंदुहृदयसम्राट वं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून नंतर शिवसेना युवासेने तर्फे अगदी लहान वयात स्केटिंग मध्ये 104 पदक पटकावणारी मनस्वीच्या आईवडिलांचा देखील सन्मान केला.

यावेळी किरणताई संजय देरकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, राजु तुरणकर, सरपंच रुपाली कातकडे, सुरेखा ढेंगळे, माधुरी सुंकुरवार, मिनाक्षी मोहिते, प्रकाश कऱ्हाड ,महेश पहापले, संतोष बेलेकर, गणेश मोहितकर, जगदीश ठावरी, आनंद घोटेकर, सुरेश शेंडे, संजोग झाडे,तुळशीराम काकडे, प्रविण खानझोडे, मिलिंद बावणे, मंगल भोंगळे, मनीष बत्रा, गणेश जूनगरी, चेतन उलमले, विवेक ठाकरे व सूरज चाटे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page