Monday, April 27, 2026
Homeवणी"मॅकरून फूड फ्लेवर " मध्ये पालकांनी परिवारासहित मनोसक्त आनंद लुटला..........!

“मॅकरून फूड फ्लेवर ” मध्ये पालकांनी परिवारासहित मनोसक्त आनंद लुटला……….!

•"ना भुतो .. ना भविष्य"असा शहरातील अविस्मरणीय हा "आनंद मेळावा."

वणी :- येथील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई वणी शाळेत दि.24 शुक्रवारी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः या कार्यक्रमाला ” मॅकरून फूड फ्लेवर” हे नाव देण्यात आले.या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालकांनी खुप मनोसक्त आनंद घेतला.

शाळेने पालकांचा आनंद द्विगुणित व्हावा याकरिता एका मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्या कार्यक्रमाला “मॅकरून फूड फ्लेवर”आनंद मेळावा म्हणून एक वेगळ्या स्वरूपाचे नावही देण्यात आले.कारण व्यवहार ,व्यवसाय व उद्योगाचे प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे म्हणून मेळाव्याचे संयोजन करणे व विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व पालकांचा अंगीकृत असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देता यावा याकरिता नृत्य, संगीत , फॅशनशो व खेळ परिवाराकरीता घेण्यात आले. विशेष आनंद मेळाव्याला(Fun n Food) विद्यार्थ्यांनी खाद्य महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थ बटाटावडा, आलूभात,मसाला पापड, सुशीला पोहे, रसवंती, झुणका भाकर,भजे, आलू नड्डा, लसूनी आयते, पावभाजी, पाणीपुरी, आलुचाट , कटोरी चाट, पापडी चाट, मंचुरियन, नूडल्स, लांब पोळी, पात्वळी भाजी, इडली, सांबर वडा, चकली, मुंग वडा, कप केक अशा अनेक पदार्थांची स्वतः निर्मिती करून खाद्यपदार्थाबरोबर  उद्योग क्षेत्रामध्ये आपण करिअर करू शकतो याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना यावा,हा या आनंद मेळाव्याचा मुख्य हेतू होता. बाल आंनद मेळाव्यात शाळेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला असंख्य पालकांनी उपस्थिती दाखविली. विशेषतः”ना भुतो .. ना भविष्य”असा वणी शहरातील एकमेव अविस्मरणीय मेळावा झाला.यात पालकांनी आपल्या पाल्यासहित नृत्य, संगीत , फॅशनशो व खेळ यात मनोसक्त आनंदही घेतला तसेच पाल्यांचा उत्साहद्विगुणित होण्याकरीता स्वतः स्टॉल देखील लावले. त्यात त्यांना आकर्षक बक्षीसेही देण्यात आले. आनंद मेळाव्यात शिवांश पोपली, झारा पठाण,रिधीमा काळे या पाल्यांना पालकांनी बक्षीसे प्राप्त केले.

या कार्यक्रमाला शिक्षणमहर्षी पि.एस आंबटकर हे अध्यक्षस्थानी होते.प्रमूख पाहुणे म्हणून शाळेचा मुख्यद्यापिका शोभना होत्या. शिक्षणमहर्षी पि.एस आंबटकर यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उदघाटन झाले.या कार्यक्रमाचे संचालन विद्या स्वप्नील पाटील व रोशनी यांनी केले.या कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page