Ajay Kandewar,Wani:- यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसरात प्रेमसंबंधातून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारेगाव तालुक्यातील 20 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून संकेत जितेंद्र बुरांडे (वय 25, रा. ब्राम्हणी, वणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत 15 ऑक्टोबर 2024 पासून 24 मार्च 2026 पर्यंत वणी येथील एका हॉटेलमध्ये तब्बल 7 ते 8 वेळा शारीरिक संबंध ठेवले.
मात्र, जेव्हा तरुणीने लग्नाबाबत स्पष्ट विचारणा केली, तेव्हा आरोपीने थेट नकार देत “मी तुझ्याशी लग्न करणार नाही” असे सांगितल्याचा गंभीर आरोप आहे.या घटनेनंतर पीडित तरुणीने 27 मार्च 2026 रोजी पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या जुबानीवरून कलम 69 बीएनएसनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास सपोनि प्रियंका चौधरी करत असून, आरोपीसह हॉटेल मालकावर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात…
या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या हॉटेलमध्ये वारंवार असे प्रकार घडले .त्या हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असूनअशा प्रकारांना थारा देणाऱ्या हॉटेल्सवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने धडक पावले उचलावी.अशा मागण्या जोर धरत आहेत.

