Ajay Kandewar Wani :- जन्म व मृत्यू आपल्या हातात नाही परंतु आपल्या वाट्याला येणारा काळ सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगल्यास ‘जीवन हे सुंदर व अमुल्य आहे.’ असा प्रेरणादायी संदेश यवतमाळ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे यांनी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल वणी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित, सेल्फ इंट्रास्पेक्शन वर्क शॉप ऑन, “लाईफ इज ब्युटीफूल अँड प्रेसिअस” या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना दिला.
अध्यक्षस्थानी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. प्रतिकुल परिस्थितीतही शिक्षण घेवून प्रगती करता येते हे लाडखेड येथील सुमैया शेख हिने दोन्ही पायाचे अवयव वआर्थिक स्थिती नसतांना सुद्धा जिद्दीने ग्रॅज्युएशन पूर्ण केले व कलाकुसरीच्या वस्तू बनवते हे चित्रफिती द्वारे सांगीतले. शारिरीक व्यंगापेक्षा मानसिक पंगुत्व आपल्याला दुबळे बनवते म्हणून पालकांनी अपयश व संकटाचा सामना करण्यासाठी पाल्यांना प्रेरीत करावे असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनो कुणालाही तुच्छ लेखू नका व स्व:तालाही कमी लेखू नका. मला अनुकूल परिस्थिती नाही म्हणून, स्वतःची फसवणूक टाळा. असा प्रेमळ सल्ला देऊन, तुलना, स्पर्धा व अपेक्षां करण्यापेक्षा २१ व्या शतकांत चौकटी बाहेर विचार करण्याचं कौशल्य विकसित करून कठोर परिश्रम करा व स्वतःची ओळख निर्माण करा. असा उपदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिलायावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची नगर वाचनालय वणी च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा लायन शमिम अहेमद यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच तालुका विज्ञान प्रदर्शनीत द्वितीय क्रमांक प्राप्त करणारी कु. स्वरा डोंगरकर व मार्गदर्शक शिक्षिका रश्मी कोसे व मोहिनी गोहोकार यांचाही पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाला लायन्स क्लब वणी चे अध्यक्ष लायन तुषार नगरवाला, लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर,लायन अभिजित अणे, लायन महेंद्र श्रीवास्तव, लायन चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन डॉ प्रसाद खानझोडे, लायन नंदलाल शुगवानी, यवतमाळचे नितीन पखाले, प्रशांत गोडे,प्रा.चित्रा देशपांडे उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ प्रसाद खानझोडे यांनी,संचालन सोनाली काळे,तर डॉ अभिजित अणे यांनी आभार मानले.

