Ajay Kandewar,Wani:- तालुक्यात वाहणाऱ्या विदर्भा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे. रेती उत्खनात कमी कालावधीत अमाप पैसा मिळत असल्याने गेल्या काही दिवसात रेती चोरी करणाऱ्याचे प्रमाण एवढे वाढले कि, प्रत्येक जण या व्यवसायात येण्याची स्पर्धाच सुरू आहे. शासकीय यंत्रणेच्या व सपेशल स्थानिक मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने अवैध रेतीचा उपसा प्रचंड प्रमाणावर होत आहे कि काय? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
शासनाची नियमावली पायदळी तुडवत रात्रभर रेती घाटावरून दररोज रात्री हजारो ब्रास रेतीची चोरी होत आहे. शासनाचा करोडोचा महसूल बुडत आहे. व्यवसायात अडथळा ठरणाऱ्या महसूल विभागावर तसेच स्थानिक तलाठ्यावर महिन्याकाठी आर्थिक देवान घेवाण संगनमत करून हा व्यवसाय मोठ्या जोमात सुरू आहे अशी गावकऱ्यात बोंब आहे. एवढेच नाही तर एखादे वेळी रेती तस्कराचे वाहन मिळाले तरी आर्थिक स्वार्थापोटी कुठलीही कारवाही न करता सोडून देण्यात येते असे अनेक प्रकार होत असल्याची चर्चा गावा गावात सुरू आहे. आणि स्थानिक अधिकारी “1 ट्रॅक्टर पकडा आणि बोंबा बोंब करा”अशी अधिकाऱ्यांची हल्लीची स्थिती निर्माण झाली आहे.”1 ट्रॅक्टर पकडवावो.. 20 ट्रॅक्टर भर के लेकर जाओ” असं चित्रं या चेंडकापुर ते मालेगांव भागात सूरू आहे.
•निर्भयपणे काळाबाजार…….
तालुक्यात विदर्भा नदी पात्रातून चेंडकापुर ते कायर मार्गावर 8 ते 9 ट्रॅक्टर अवैध रेती ट्रॅक्टर धावताहेत तसेच मालेगाव ते सिंधी ,कोसारा, दरा या चोरट्या मार्गावर 10 ते 22 ट्रॅक्टरनी अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जात आहे. प्रत्येकी ट्रॅक्टर 5 ते 6 हजार रु.घेऊन मूकसंमती दिल्याची ही जोरदार चर्चा आहे.या भागात निर्भयपणे रेतीचा काळाबाजार सद्यःस्थितीत सुरू आहे. विशेषतः या रेती चोरट्यांना येथील स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी रेती तस्करांना यांचे पाठबळ असल्याशिवाय 18 ते 19 ट्रॅक्टर चालत आहे.हे न समजणारे कोडच आहे.
•चोरीच्या रेतीला सोन्याचे भाव
वणी तालुक्यात रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. 1 ट्रॅक्टर रेती चक्क ८ ते 10 हजार रूपयाला विक्री केली जात आहे. त्यामुळे चोरीच्या रेतीला आता सोन्याचे भाव आले आहेत.
•विदर्भा नदी पात्रात रेती तस्करांकडून एन्ट्री फी ….. अशी चर्चा …
रेतीच्या या गोरखधंद्यात रेती तस्करांसोबत तलाठी, मंडळ अधिकारी, या सर्वांचे उखळ पांढरे होत आहे. त्यामुळे सर्वांनी बघ्याची भूमिका घेतलेली आहे. रेती तस्करीची सूचना दिल्यावरही कारवाई केली जात नाही अशी काही गावकऱ्यांची तक्रार प्राप्त आहे. वणी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तरी यावर अंकुश लावतात काय की पुन्हा त्याच मंडल अधिकारी व तलाठी यांचा वर सोडतात का ?याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारवाई होत नसेल तर पाणी कुठे मुरत आहे “हेदेखील स्पष्ट आहे.

