अजय कंडेवार,वणी : संपूर्ण महाराष्ट्रात ४ ते ११ ऑगस्ट दरम्यान ‘भगवा सप्ताह’ साजरा करण्याच्या सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी झूम बैठकीच्या माध्यमातून दिल्या. विशेषतः पहिला भगवा सप्ताह १९८७ मध्ये साजरा झाला होता त्याचीच आठवण करून देत ठाकरे म्हणाले की, गाफील न राहता महाराष्ट्रातील विधानसभा लोकशाही वाचविण्यासाठी जिंकायचीच या ईर्ष्येने काम करा. असा आदेश देताच वणी विधानसभेत पक्षासाठी अहोरात्र एक करीता निष्ठेने बाळासाहेबांचे विचार मनात रोवुन सेवा करणारे. पक्षाचा प्रत्येक चढाओढीत एकनिष्ठ राहून किल्ला आजपर्यंत शाबूत राखून ठेवणारे शिवसेना (उबाठा) गटाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी साहेबांचा आदेशाचे पालन करीत वणी विधानसभेत विविध उपक्रमांनी “भगव्या सप्ताहाची” सुरूवात केली.
या “भगव्या सप्ताहात” वणी विधानसभा क्षेत्रात अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. हा भगवा सप्ताह 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पूजनाने व शिवाजी चौक व बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून सप्ताहाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर दुपारी टिळक चौक, साईमंदिर परिसर साधनकरवाडी येथे शाखा फलकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर मारेगाव व झरी तालुक्यात पक्षाचे कायक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता झरी तालुक्यातील मुकुटबन येथे पावसाळा व रोगराईचा विचार करून जंतुनाशक फवारणी करण्यात आले. 6 ऑगस्ट रोजी वणी येथील न.प. शाळा क्रमांक 3 मधील विद्यार्थ्यांना वह्या व पेन्सिल वाटपाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता झरी तालुक्यातील पक्षाच्या फलकाचे नूतनीकरण करण्यात आले.
याच दिवशी वणी ग्रामीण भागात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. 7 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता वणीत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर वणी शहरातील शाखा फलकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. 8 ऑगस्ट रोजी वणी मधील जिल्हा परिषद शाळा 1 ते 4 वर्ग येथील विद्यार्थ्यांना बुक व पेन्सिल वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. याचा दिवशी सायंकाळी 5 वाजता वणीतील अनेक परिसरात शाखा फलकाचे अनावरण व नूतनीकरण करण्यात येणार आहे.