अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील मोहदा ग्रामपंचायतीं अंतर्गत येणाऱ्या गट क्र. ७५ या ई-क्लास जमीनीवरून मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खनन होत आहे. अवैधरीत्या हे उत्खनन करताना एका ट्रकचालकाला ग्रामपंचायतीच्या सदस्यानी रंगेहाथ पकडले. मात्र – सदर ट्रकचालक तेथून पळून गेला. – दरम्यान या भागात १०० ते २०० ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन झाल्याची तक्रार ग्रामपंचायतीने ६ ऑगस्टला तहसीलदारांकडे केली आहे. यामध्ये कारवाई करण्याची मागणीही केली आहे. आतापर्यंत तरी तहसिलदारांची बघ्याची भुमिका स्पष्ट दिसून येतं आहे. परंतु यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Revenue department systems are sleeping.Tehsildar’s role as a watcher, situation like a secret.
मोहदा ग्रामपंचायतीच्या गट क्र. ७५ या ई-क्लास जमीनीतून दररोज मुरूमाचे अवैध उत्खनन व चोरटी – वाहतूक होत आहे. शासनाची रॉयल्टी चुकवून हे उत्खनन होत असताना महसूल विभागाची यंत्रणा निद्रिस्त आहे. ३ ऑगस्टला शनिवारी निकाश शेंडे ट्रान्सपोर्टधारकाने सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान सदर जमिनीतून मुरूमाचे अवैध उत्खनन सुरू केले.
दरम्यान ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तिथे धडकले. यावेळी एमएच ३४, डीझेड २३५७ या क्रमांकाचा ट्रक तिथे आढळून आला. मात्र ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तिथे पोहोचल्यावर सदर व्यक्ती पळून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. सदर जागेतून १०० ते २०० ब्रास मुरूमाचे उत्खनन झाल्याचे आढळल्याने सदर व्यक्तीवर महसूल विभागामार्फत दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश बोंडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष खलिल शेख, विशाल कुचनकार, अमित गेडाम, वामन उईके, राहुल पावडे यांनी ६ ऑगस्टला तहसीलदारांकडे केली आहे.
कोड…
याबाबत तलाठी डोहे यानां माहिती विचारली असता त्यांनी सांगीतले की ,या सदर प्रकरणाबाबत पंचनामा करून तहसिल कार्यालयात वरिष्ठांना पाठविण्यात आले आहे. जर दोषी आढळल्यास यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे यात शंका नाहीं.”- आकाश डोहे (तलाठी, मोहदा)