अजय कंडेवार,Wani:- मोहदा गावातील सरपंच राजुरकर व उपसरपंच सचिन रासेकर यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत कार्यालय, मोहदा पंचायत समिती वणी तर्फे स्वच्छ भारत,एक कदम स्वच्छता की ओर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत किशोरवयीन मुलींची कार्यशाळा, कचरा कुंडीवाटप व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन गुरुवार दि ९ जानेवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रांगणात झालेला कार्यक्रमात सरपंच राजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी समाजात घडणाऱ्या घटनांचा पाढाच विद्यार्थिनींना वाचून दाखविला आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला व गरज पडल्यास 112 वर फोन करून पोलिसांची मदत घेऊ शकता व अघटित टाळू शकता याची जाणीव विद्यार्थिनींना करून दिली. जसे की, मला जे हवे ते मी कसेही मिळविणारच, अशी प्रवृती आपल्या साथीदारावर हल्ला करण्याच्या घटनांना कारणीभूत आहे. त्यामुळे आपले पाल्य अशा मनस्थितीतून किंवा परिस्थितीतून जात असतील तर त्यांचे योग्य समुपदेशन व्हायला हवे. तसेच प्रेमसंबंध तुटले किंवा आणखी कोणताही प्रसंग आला तर त्यावेळी संयम बाळगला पाहिजे, अशी शिकवण मुलांना लहानपणापासूनच द्यायला हवी. तसे झाल्यास अशा प्रकारच्या घटना कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास गणेश कींद्रे यांनी केला.
तसेच किशोरवयीन मुलींशी छेडखानी होऊ नये यासाठी त्यांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलींना कायद्याचे ज्ञान देण्यासाठी तालुका विधी सेवा समितीतर्फे ऍड तेलंग,ऍड मत्ते व ऍड.वायचळ यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केलें.या कार्यक्रमात पंचायत समिती वणी येथील गटसमन्वयक सुभाष लोखंडे यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा कुंडी वाटप व स्वच्छते विषयी मार्गदर्शन करत असताना म्हणाले की गावातील कचऱ्याचे निराकरण कशा प्रकारे करावे ,आपले गाव व आपले घर कशा पद्धतीने स्वच्छ ठेवावे याबद्दल विशेष मार्गदर्शन केले तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोहदा ग्रामपंचायतची तालुक्यातून निवड करण्यात आली व पारितोषिक पन्नास हजार रुपये रक्कम जाहीर केले. शिरपूर अंगणवाडी पर्यवेक्षिका सुषमा अरके यांनी गरोदर मातांना व बालकांना पोषक आहार यासंबंधी मार्गदर्शन केले.प्रिया नाकाडे यांनी देखील बालविवाह व बाल गुन्हेगारी यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिरपूर ठाणेदार माधव शिंदे यांनी सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे होणारे तोटे याबाबत किशोरवयीन मुलींना संबोधन केले. शिरपूर आरोग्य विभागाचे एम.ओ सतिश जांभुळे,”मनुष्याने खानपान वर नियंत्रण करून वेळीच उपचार घेऊन आरोग्यास सुदृढ ठेवावे, असे विशेष मार्गदर्शन केले.”यानंतर अध्यक्ष भाषणात वर्षा राजुरकर यांनी महिला व किशोरवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत संबोधन केले.
या कार्यक्रमाला उपस्थित रुपेश हिवरकर, राहुल मानकर, वाघमारे, आ.से.सुखदेवे, आशा वर्कर्स ,अंगणवाडी सेविका, बचत गट महिला, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होतें. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार वडस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन गावातील उपसरपंच सचिन रासेकर यांनी केले.