Ajay Kandewar,वणी:- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीचा जोर सूरू झाला असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांचे गावोगावी दौरा करून प्रचार सुरु आहे. देरकर यानी मंगळवार 12 नोव्हे रोजी वणी तालुक्यातील वांजरी, मजरा, नांदेपेरा, रांगणा, शेलु , भुरकी वडगाव, नायगांव, झोला, सावर्ला,कोना,निळापुर,ब्राम्हणी, कोलार पिपरी, भालर वसाहत, भालर, बेसा,लाठी, निवली व सुंदरनगर या गावांचा दौरा करुन मतदारांशी संपर्क साधला.
या दौऱ्याच्या निमित्ताने संजय देरकर यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधत मताचा आशीर्वाद मागितला. यावेळी गावकऱ्यांनी या प्रचार दौऱ्याला भरभरून प्रतिसाद दिला. वणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी कडून संजय देरकर यांचा झंझावाती प्रचार करण्यात येत आहे. शिवसेना व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते गावागावात जाऊन संजय देरकर यांचा सकारात्मक प्रचार करीत आहेत. वणी विधानसभा क्षेत्रात मशाल पेटवायचीच हे उद्दिष्ट ठेऊन महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. संजय देरकर यांच्या प्रचार दौऱ्यांना जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.यावेळी काँग्रेसचे नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते.