अजय कंडेवार,वणी:-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांना प्रेरणास्थान देणारा कडवट शिवसैनिक (शिंदे गट) वणी शहर प्रमुख ललित लांजेवार यांनी वयाच्या45 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
बुधवारी रात्री सायंकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सर्वोदय चौक येथील राहते घरी त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ललित यांच्या मृत्यूची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच त्यांच्या कुटुंबीय व मित्र परिवाराने दवाखान्यात एकच गर्दी केली होती.
ते वणी शहराचे शिवसेना प्रमुख म्हणून कार्यरत होते. शहर शिवसेना रूजविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. कडवट निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. समाजकारणाचा ध्यास घेत कडवट अन् करारी बाणा शेवटच्या श्वासापर्यंत जपणाऱ्या ललित लांजेवार यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला .ललित यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे.