अजय कंडेवार,वणी :- शिवसेना (ऊबाठा) गटाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी पंढरपूर येथील ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिराला ता. १४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता सामुदायिक प्रार्थनेच्या वेळी येवून सर्व गुरुदेव उपासकांची सदिच्छ भेट दिली. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष जनार्दन देठे यांचे हस्ते संजय देरकरांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लीहलेला ग्रामगीता ग्रंथ भेट देवून सन्मानित करण्यात आले.
आषाढी वारी निर्मिती श्रीक्षेत्र वेगाव येथील येणारी पायदळ वारी महिनाभर पायदळ चालून आज पंढरपुरात आगमन झाले असता त्या वारीच्या स्वागतासाठी संजय देरकर हे पंढरपुरातील श्री जगन्नाथ महाराज मठ गोपालपुरी येथे उपस्थित झाले होते. त्यांचं निमित्याने त्यांनी पंढरपूर येथील सांगोला रोडवरील कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य यांच्या संकल्पनेतील ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर येथे येवून मंदिराला सदीच्छ भेट दिली यावेळी उपस्थित सर्व उपासकांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
यावेळी मंदिर समितीचे संयोजक सेवकराम मिलमिले, अध्यक्ष जनार्दन देठे, कार्याध्यक्ष रघुनाथ माचेवाड, सचिव दिलीप भोयर , सदस्य नामदेवराव काळे, राष्ट्रीय कीर्तनकार तथा तेलंगाना राज्याचे प्रमुख डॉ. हभप सुरेश उदार महाराज, कवडू वडस्कर, रामदास पखाले, चंपत पाचभाई, कवडू वाढई, डॉ. विवेक गोफने यांचेसह शेकडो उपासक उपसिका उपस्थित होते.