अजय कंडेवार,Wani:-परभणी जिल्ह्यातील दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी असून त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय. दरम्यान या प्रकरणामुळे आता परभणीत पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. या तरुणांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली असल्याने सर्व मोहदा, वेळाबाई येथील जनतेला आवाहन करण्यात येते की, सोमवार दि.16 रोजी मोहदा वेळाबाई रस्त्यासाठी आयोजित रास्ता रोको आंदोलन हे परभणी येथे कारागृह दगडफेकीत दुर्घटना झाल्याने शिरपूर पोलीस विभागाकडून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, त्याकरिता सोमवारी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करून मंगळवार दिनांक 17.12.24 ला 9.30 वाजता लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.