Ajay Kandewar,Wani :- पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे संकल्पनेतून पोलिस व जनता यांचे संबंध सलोख्याचे करण्याकरिता ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्हास्तरीय यवतमाळ पोलीस क्रिडा महोत्सव दि.२० जानेवारी २०२५ ते २२ जानेवारी २०२५ रोजी पळसवाडी ग्राउंड यवतमाळ येथे आयोजीत करण्यात आले होते.या क्रीडा स्पर्धेत वणी उपविभागाने बाजी मारत चॅम्पियन ठरला आहे. यात क्रिकेटमध्ये वणी उपविभाग फर्स्ट तर महिला कबड्डीत द्वितीय व इतर क्रीडा खेळातही वणी उपविभागानें किताब खेचून आणला
या स्पर्धेत अवघ्या जिल्ह्यातील क्रीडा खेळाडू सहभागी झाले. यात जिल्हाभरातून वणी उपविभाग क्रिकेट चॅम्पियन ठरला तर महिला पोलिस कबड्डीत द्वितीय बाजी मारत जिल्हा क्रीडा महोत्सवात “वणी “चा डंका वाजला .आपल्या कामाच्या कर्तव्यदक्षपणासोबत क्रीडा स्पर्धेत बाजी मारून वणी उपविभागाचे नाव उंचावल्याने या स्पर्धेत सहभागी झालेल्या वणी पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केल्या जात आहे.