Thursday, July 23, 2026
HomeCityवणीत २७२ रक्तदात्यांनी दिले जीवनदान......

वणीत २७२ रक्तदात्यांनी दिले जीवनदान……

Wani:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांऐवजी रक्तदानाचा सामाजिक संदेश देत भारतीय जनता पार्टी वणी शहर, वणी ग्रामीण पूर्व आणि वणी ग्रामीण पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात बाजोरिया हॉल, वणी येथे हेडगेवार रक्तकेंद्र, नागपूर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून झालेल्या या शिबिरात ४१२ जणांनी नोंदणी केली, तर वैद्यकीय तपासणीनंतर २७२ रक्तदात्यांनी रक्तदान करून वाढदिवसाला समाजोपयोगी स्वरूप दिले. वणी शहरातून २०५ नोंदणी व १५२ रक्तसंकलन, ग्रामीण पूर्वमधून १३२ नोंदणी व ७० रक्तसंकलन, तर ग्रामीण पश्चिममधून ७५ नोंदणी व ५० रक्तसंकलन झाले. दिवसभर पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

शिबिराला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ज्येष्ठ किसान नेते दिनकर पावडे, ज्येष्ठ कामगार नेते विजय पिदुरकर, माजी जिल्हाध्यक्ष राजू डांगे, तारेंद्र बोर्ड, ओबीसी आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष पवन एकरे तसेच माजी यवतमाळ जिल्हा परिषद गटनेत्या मंगला पावडे यांनी भेट देऊन रक्तदाते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगर परिषद वणीच्या नगराध्यक्षा विद्याताई आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, विधानसभा प्रमुख व जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, रक्तदान अभियान विधानसभा संयोजक व जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोडे, जिल्हा सचिव संतोष डंभारे, जिल्हा सचिव नितीन वासेकर, माजी तालुकाध्यक्ष गजानन विधाते, माजी वणी पंचायत समिती सभापती लिशाताई विधाते, ज्येष्ठ नेत्या जयमालाताई दरवे, ज्येष्ठ नेत्या संध्याताई लोडे तसेच जिल्ह्यातील व वणी विधानसभेतील आजी-माजी लोकसेवक, पदाधिकारी, नगर परिषद वणीचे सर्व सन्माननीय सभापती व नगरसेवक, तीनही मंडळांचे अध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी, विविध आघाडी व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच रक्तदान शिबिराचे संयोजक व सहसंयोजक यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन भारती बदखल यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैशाली वातिले यांनी केले. बाजोरिया हॉलचे संचालक विनोद बाजोरिया यांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांपेक्षा “रक्तदानातून जीवनदान” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत वणीकरांनी सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण घालून दिल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page