Friday, July 24, 2026
Homeवणीतिरळे कुणबी समाजाचा १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान...

तिरळे कुणबी समाजाचा १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान…

Wani : वणी तालुका तिरळे कुणबी समाज संघटनेच्या वतीने शेतकरी मंदिर येथे दहावी-बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाज मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवलेल्या १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ईश्वरी राऊत, मोहीन हिवरकर, डॉ. साक्षी भोयर, नीलिमा काळे, नारायण गोडे, विजय ढाले, सुभाष इंगोले, वैशाली वातीले व प्रमिला चौधरी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. महिलांसाठी आयोजित आरोग्य शिबिरात डॉ. प्रज्ञा महाजन, डॉ. साक्षी भोयर व डॉ. पूजा काळे यांनी आरोग्य तपासणी करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नारायण देवडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद यवतमाळचे माजी उपाध्यक्ष नरेंद्र ठाकरे, सर्व शाखीय कुणबी समाजाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी, वणी, केळापूर व मारेगावचे तालुकाध्यक्ष आशिष काळे, अशोक बेले, प्रकाश पवार तसेच राजेंद्र खांडेकर, वसंतराव पडोळे, डॉ. राऊत व प्रा. देविदास गायकवाड उपस्थित होते. विशाखा चौधरी यांनी जिजाऊ वंदना, वैशाली तायडे व वैष्णवी लिमये यांनी स्वागतगीत, तर भार्गवी महाजन हिने नृत्य सादर केले. सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. प्रास्ताविक आशिष काळे यांनी, तर आभार प्राचार्य प्रशांत गोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंत देवडे, अशोक चौधरी, राहुल इंगोले, संतोष भेले, मनीष चौधरी, कार्तिक देवडे, मनोज चौधरी, सचिन पोहेकर, प्रशांत गोमकर, सुमित्रा गोडे, वैशाली तायडे, सविता रासेकर तसेच कार्यकारिणीचे सर्व सदस्य व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page