Saturday, September 12, 2026
HomeUncategorizedवणीत कौशल्य प्रशिक्षणातून युवक-महिलांच्या स्वावलंबनाला बळ.....

वणीत कौशल्य प्रशिक्षणातून युवक-महिलांच्या स्वावलंबनाला बळ…..

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यात युवा संघर्ष संस्था, वणी यांचा माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘आपला व्यवसाय–आपले भविष्य’ या संकल्पनेतून ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी वायरमन, इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग, डेटा एन्ट्री ऑपरेटर, डीटीपी जॉबवर्क, बेसिक कॉम्प्युटर, सीसीटीव्ही टेक्निशियन, मोबाईल रिपेअरिंग, फिटर, प्लंबर आणि मोटार मेकॅनिक यांसारखे अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

महिलांसाठीही घरबसल्या किंवा लघुउद्योगाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उभे करता यावे, यासाठी ब्युटी पार्लर, टेलरिंग, केक मेकिंग, मेहंदी क्लास, मसाला बनवणे, अगरबत्ती बनवणे, कापूर बनवणे, पेपर बॅग, साबण तसेच डिटर्जंट बनवणे/लिक्विड तयार करणे यासारख्या प्रशिक्षणांचा समावेश आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, बटेर पालन, दुग्ध व्यवसाय, वराह पालन, मशरूम शेती आणि मत्स्यपालनाचे प्रशिक्षणही उपलब्ध करून देण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे पारंपरिक रोजगाराच्या मर्यादेपलीकडे जाऊन कौशल्याच्या आधारे स्वयंरोजगार उभारण्याची दिशा या उपक्रमातून मिळू शकत.

या प्रशिक्षणाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कौशल्यासोबत व्यवसायाची संधी निर्माण करण्यावर दिलेला भर. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र मिळणार असून, ते विविध शासकीय योजनांसाठी उपयुक्त ठरेल.ग्रामीण भागातील बेरोजगार युवक, महिला तसेच शेतीला पूरक व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी उपलब्ध प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य विकसित करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज आहे. आजच संपर्क साधा :-90677 59030.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page