Ajay Kandewar Wani:- वणी मारेगाव मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना एकाचा १० जानेवारीला रात्री उशिरा तर दुसऱ्याचा ११ जानेवारीला पहाटे मृत्यू झाला. वणी वरून मारेगाव तालुक्यातील पाहपळ या आपल्या गावी परतत असतांना निंबाळा फाट्याजवळील रुद्राक्षवनाच्या गेट जवळ त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले होते. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. या दोघांनीही शेवटचा श्वास घेतला. विजय संभाजी थेरे वय अंदाजे ३५ वर्षे व नितीन खुशाल पायघन वय अंदाजे २८ वर्षे अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मित्रांची नावे आहेत.
रुद्राक्षवनाजवळचा अपघात अन् दोघांचाही मृत्यू…..!
•निंबाळाजवळील घटना.
मागील बातमी देखील वाचा :-
संपादक
अजय संजय कंडेवार'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.