•गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर लावली रेल्वे
वणी :- रेल्वे आपल्या भागात मोठ्या प्रमाणात रेल्वे सायडिंग चा विस्तार करीत असून गावातील रहिवासी क्षेत्रालगत सायडिंग वाढविली आहे. ही सायडिंग गावात येणाऱ्या मुख्य रिंग रोडवर असून हाच गावाचा मुख्य रस्ता आहे. ह्या सायडिंगवर रेल्वेने गिट्टी भरण्यासाठी रैक लावल्यामुळे हा रस्ताच बंद झाला आहे. परिणामी संपूर्ण वाहतुकच थांबली आहे. हा प्रकार सर्रास गावकऱ्यांना वेठीस धरणारा आहे. रेल्वेच्या ह्या मुजोरी मुळे गावातील उत्पादन क्षेत्रावर आणि उलाढालीवर विपरीत परिणाम होणार आहे.
गावात रेल्वेने उभारलेल्या सायडिंग व विस्तार करीत असलेल्या सायडिंग च्या कार्यामुळे गावात प्रदूषणासहित गाव खाली करण्याचा नोटिसांमुळे संपूर्ण गाव दहशतीखाली आला असून येथील गरिबांना व रहिवासीयांना प्रचंड मानसिक दबाव झेलावा लागत आहे. ह्याचाच परिणाम म्हणून राजूर बचाव संघर्ष समितीचे माध्यमातून “सायडिंग हटाव व गाव बचाव” ही मोहीम उघडून सातत्याने आंदोलन सुरू आहे. दि.17 ऑक्टोबर2022 पासून वणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येत आहे. हे सर्व एकीकडे सुरू असताना रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा कुरघोडी करीत मुजोरीने मुख्य रस्त्यावर उभारलेल्या सायडिंगवर रैक लावून गावकऱ्यांवर नवीन संकट उभे केले आहे. गावात येणारा मुख्य रिंग रोड रस्त्याच बंद पडल्याने गावात येजा करणारी वाहतुकच पूर्णपणे थांबली आहे.
दि. 17 ऑक्टोबर 22 सोमवार पासून राजूर बचाव संघर्ष समिती द्वारे सुरू होणाऱ्या आंदोलनातून जे काय निर्णय लागायचे आहे ते लागेल, परंतु तूर्तास रेल्वेने पुन्हा एक नवीन संकट गावकऱ्यांसमोर उभे केले आहे. रेल्वेचा हा प्रकार असाच सुरू राहिल्यास येथील राहिवासीयांना मात्र शारीरिक, मानसिक व आर्थिक संकट वाढणार आहे.