•पदवीधर मतदार नोंदणी सुरू …
•काँग्रेसचे दमदार नेतृत्व म्हणून डॉ. महेंद्र लोढा यांचा नावाची जोरदार चर्चा….
अजय कंडेवार, वणी – अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याचे काम सुरू झाले आहे. अमरावती विभागात एकूण पाच जिल्हे आहे . यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील पदवीधर मतदाराने स्वतः जागृत होऊन पदवीधर मतदारसंघात मतदानाची नोंदणी केली तर मतदारसंघात वाढ होईल त्यात काही शंकाच नाही तसेच या पदवीधर युवकांमध्ये डॉ .महेंद्र लोढा यांचाकडे उत्साहपूर्वक कल दिसून येत आहे..


त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ महेंद्र लोढा यांनी पुढाकार घेऊन स्वतः व कार्यकर्त्यांसोबत मतदार नोंदणी अर्ज क्रमांक 18 घेऊन मतदार संघात निघाले आहे व मतदार संघातील पदवीधरांना आवाहन करण्यात येत आहे की 1 नोव्हेंबर 2022 च्या 3 वर्षे आधी पदवीधर झाला असेल तर त्याने योग्य कागदपत्रांसह 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.

अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदणीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे . मतदार नोंदणीसाठी रहिवासी पुरावा, आधारकार्ड, विद्यापीठ संबधीत पदवी प्रमाणपत्र, कागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपुत्र/ विवाह नोंदणी प्रमाणपत्र/ संबधीत कायदेशीर पुरावा व वरील कागद पत्रांची प्रत स्वयंसाक्षांकीत व पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून अधिप्रमाणित करून जोडणे आवश्यक आहे.

या पदवीधर मतदारसंघात विविध राजकीय पक्षांनी पदवीधर मतदार वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु वणी विधानसभा क्षेत्रातील पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ महेंद्र लोढा यांनी पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत आहे .त्यामुळे पदवीधर मतदारांसाठी मतदारसंघ पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे. पदवीधरात नवचैतन्य व जागृती निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्याच्या तयारीत आहे असे डॉ महेंद्र लोढा यांनी बोलून दाखविले आहे.

दमदार नेतृत्व डॉ . महेंद्र लोढा….….. व युवकांचे प्रेरणास्थान म्हणूनही उपविभागात अव्वल……..
“वणी शहरातून काँग्रेसचे दमदार नेतृत्व असलेले तसेच वैद्यकीय क्षेत्रात दानी व्यक्ती म्हणून परिचित असलेले डॉ. महेंद्र लोढा यांच्या संपर्कात असलेले प्राध्यापक, शिक्षक, अंशकालीन, असंघटीत पदवीधर, शासकीय कर्मचारी संघटनांचा प्रंचड मोठा पाठिंबा असल्याने येणारी पदवीधर निवडणूक सहज व सोपे काँग्रेसमयी तसेच एकतर्फी होईल त्यात काही शंका नाही.”

