अजय कंडेवार,Wani :- विदर्भाच्या क्रीडा क्षेत्रात प्रथमच सिलंबम या खेळाचे आयोजन सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलंबम असोसिएशन द्वारा महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय लाठी काठी चॅम्पियनशिप चे आयोजन दि 28 29 सप्टेंबर ला भद्रावती येथे करण्यात आले होते. यात वणीच्या पदरात 16 पदके मिळविण्यात घवघवीत यश आले.
दरम्यान वणीतील शिवआनंद लाठी काठी ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित उत्कृष्ठ खेळाची कसरत दाखवीत 7 सुवर्ण पदक, 6 रोप्य तर 3 ब्राँझ पदके मिळविण्यात घवघवीत यश आले.यात महेश्वरी राजु गव्हाणे 1 सुवर्ण 1 ब्राँझ, श्रावणी घोसरे 2 सुवर्ण, माही उर्फ मोक्षिता दीपक देठे 1 सुवर्ण 1 रौप्य, दुष्यंत गव्हाणे 1 रौप्य 1 ब्राँझ, खुशी सहारे 1 सुवर्ण 1 रौप्य, ज्योती सहारे 1 रौप्य 1 ब्राँझ, जान्हवी चिकटे 2 रौप्य आणि तेजस्विनी गव्हाणे 2 सुवर्ण तर उत्कृष्ठ कोच म्हणुन राजु देवराव गव्हाणे यांचा सन्मान करण्यात आला.
सदर विद्यार्थी शहरात दाखल होताच वणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, वणी ठाणेदार अनिल बेहराणी, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ महेंद्र लोढा यांचा हस्ते सत्कार करण्यात आलें.