अजय कंडेवार,Wani:- न. प. वणी च्या मुख्याधिकारी यांचेवर कारवाई करण्यात यावे याकरीता दि.4.नोव्हें.रोजी रविंद्र कांबळे यांनी नगर विकास विभाग सचीव मुंबई व नगर परिषद प्रशासन सचीवालय आयुक्त ,मुंबई यांना पत्र पाठविलें आहे.
हेच ते पत्र……
न. प. वणी घंटागाडी मार्फत कचराजमा करून तो कचरा डेपोवर नेल्या जातात. त्या घंटागाडीवर अंदाजे 6 महीने पासून क्रमांक लिहलेला नव्हता त्यामुळे रविंद्र कांबळे यांनी मुख्याधिकारी यांची यवतमाळ जिल्हाधिकारी यांचेकडे व आर. टी. ओ विभागाकडे तसेच वणी वहातूक उपशाखा (पोलीस) या विभागाकडे तक्रार केली होती. तसेच वणी मुख्याधिकारी यांनी अतिक्रमणच्या वेळी ज्या सफाई कामगाराकडे ट्रॅक्टर चालवायचे परवाना नाही त्या कर्मचा-याकडून ट्रॅक्टर चालवून घेतले. याबाबत रविंद्र कांबळे यांनी माहीती अधिकारा अंतर्गत न. प. वणीला माहीती मागीतली परंतु त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे कांबळे यांना नाईलाजाने अपील करावी लागली. त्यानंतर दि. 9.10.2024 ला ज्याच्याकडे हलके वाहन चालवण्याचा परवाना आहे हे त्या महिती अधिकारातून सिद्ध झाले.तरीही त्या ट्रॅक्टर चालकाकडून ट्रॅक्टर चालवून घेतले.त्या नंतर कर्मचा-याला 500 रू. चा दंड करण्यात आला .
दुसरी बाब अशी की,दि. 15.10.2024 ला वणी शहरात दोन गायी मरण पावल्या त्याचे पोटामध्ये वासरू होते असे निवेदनात नमूद आहे.पण त्या गाई कशाने मरण पावल्या ? याकरीता शवविच्छेनद करणे गरजेचे होते परंतु त्यांनी शवविच्छेदन केले नाही. एकप्रकारे त्यांनी गैरकृत्य केले. असा घणाघाती आरोप रविंद्र कांबळे यांनी निवेदनातून केले आहे त्यामुळे वणीचा त्या मुख्याधिकारी यांना नीयम समजत नाही. असाही आरोप लावला आहे.म्हणुन त्यांची प्रतीनियुक्ती सचिवालयात लिपीक पदावर करावी तसेच आपल्या कार्यालयामार्फत त्यांची शिपाई पदावर नियुक्त करीत असेल तर त्या बाबतही कांबळे यांच्या आक्षेप राहणार नाही याबाबत लेखी कळवावे अशी विनंती ही पत्राद्वारे मागणी स्वरूपात कांबळे यांनी केली आहे.