•शहरात पहिल्यांदाच “लेझर शो “चे आयोजन मनसेतर्फे.
अजय कंडेवार,वणी :- सर्व देशवासियांना प्रतीक्षेत असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि राममूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोमवारी (दि. २२) रोजी होणार आहे. अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण आणि मूर्तीच्या स्थापनेमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे पाचशे वर्षानंतर श्री राम मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. ठिकठिकाणी मिरवणूक, होमहवन आदी धार्मिक विधींचे आयोजन केले आहे. घरोघरी, मंदिर परिसर भगव्या पताका आणि दिव्यांनी उजळून निघणार आहे.
याचे औचित्य साधून वणी येथे भव्य महाआरती, लेझर शो आणि फटाक्यांची शाही आतिषबाजी असून संपूर्ण वणी शहर भगवमय होणार आहे. अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजु उंबरकर यांनी माहिती दिली.
राम मंदिर उद्घाटन आणि मूर्ती प्रतिष्ठपने निमित्त जगभरात दीपोत्सव, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने वणीतील नागरिकांना देखील आनंदोत्सव साजरा करावा यादृष्टीने या महाआरतीचे आयोजन केले आहे. या आनंदोत्सवात सर्व वणीतील नागरिकांनी सहभागी होऊन जल्लोषात आनंदोत्सव साजरा करावा तसेच नागरिकांनी घरासमोर पणती, रांगोळी, भगवा ध्वज उभारून प्रभू श्रीरामाचे हृदयस्पर्शी स्वागत करावे, असे आवाहन उंबरकर यांनी केले आहे. तर या कार्यक्रमादरम्यान मंदिर इतिहासात आपले योगदान दिलेल्या वणी शहरातील कार सेवकांचा व त्यांच्या कुटंबियांचा सत्कार – सन्मान करण्यात येणार आहे. तर या कार सेवकांना या महाआरतीचा मान देण्यात देण्यात येणारं आहे.
वणीकर जनता पहिल्यांदाच अनुभवणार लेजर शो
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी विभागांत नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची मालिका चालवत असून, आता या कार्यक्रमाच्या माध्यमांतून शहरांत पहिल्यांदाच लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापना निमित्त वणीत लेझर शो, महाआरतीचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेला लेझर शो वणीकरांना पहिल्यांदाच अनुभवयास मिळणार आहे. तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीने हा आनंदोत्सव साजरा केला जाणार असून आपण सहकुटुंब या आनंदोत्सवात सहभागी व्हावे.